Dhule Car Accident : वाहनावरील ताबा सुटला अन् कार कोसळली पुलाखाली; ४ जण गंभीर जखमी

Accident News : भीषण अपघातात ४ जण जखमी असल्याची असल्याची माहिती आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आसे असून त्यांच्यावर शर्थिचे उपचार सुरू आहेत.
Dhule Car Accident
Dhule Car Accident Saam TV

भूषण अहिरे, साम टीव्ही न्यूज, धुळे

शिरपूर तालुक्यातील बोराडी-पानसेमल रस्त्यावरील वळणावर पुलावरून एक कार थेट खाली कोसळी आहे. या भीषण अपघातात ४ जण जखमी असल्याची असल्याची माहिती आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आसे असून त्यांच्यावर शर्थिचे उपचार सुरू आहेत.

Dhule Car Accident
Nana Patole Car Accident: नाना पटोले यांच्या कार अपघातप्रकरणी काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र, चौकशीची केली मागणी

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने एक कार थेट पुलाखाली कोसळली. या अपघातात चालक, दोन मुले, एक महिला असे एकूण चार प्रवास करत होते. हे चौघेही गंभीर असल्याचं समजलं आहे. जखमींना प्राथमिक उपचारासाठी शिरपूर येथील शासकीय रुग्णालयात व त्यानंतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बांधकाम विभागाने पुर्लक्ष केल्याने हा अपघात झाला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. कारण सदर पुलावर कठडे लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे येथून वाहन जाताना थेट खाली कोसळते. या भागात वारंवार अशा प्रकारचे अपघात होत आहेत.

मात्र या अपघातांकडे बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. वळणावरील या पुलाला देखील संरक्षण कठडे नसल्याने ही कार थेट पुलाखाली जाऊन कोसळली. जर संरक्षण कठडे असते तर कार पुलाखाली कोसळली नसतीआणि हा अपघात देखील झाला नसता असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

परभणीमध्ये बस पुलावरून खाली कोसळली

परभणीमध्ये देखील काही दिवसांपूर्वी असाच अपघात घडला होता. जिंतूरहून सोलापूर जाणाऱ्या बसचा अकोली पुलाजवळ भीषण अपघात झाला होता. यात बस थेट पुलावरून खाली कोसळली होती. त्यामुळे बसमधील २५ प्रवासी जखमी झाले होते.

Dhule Car Accident
Nandurbar Accident : बस- कारची समोरासमोर धडक; अपघातात मुलीचा मृत्यू, चार जण जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com