Tuljapur Water Shortage : तुळजापुर तालुक्यात चार प्रकल्पातील पाणी आरक्षित; संभाव्य टंचाईच्या अनुषंगाने जिल्हाधिकारींचे आदेश

Dharashiv News : राज्यात मागील वर्षी चांगला पाऊस झाला आहे. यामुळे पाणी टंचाई अधिक गडद राहणार नसल्याची शक्यता वर्तविली जात होती. असे असले तरी मार्च महिन्याची सुरवात झाल्यानंतर उन्हाच्या झळा जाणविण्यास सुरवात झाली
Tuljapur Water Shortage
Tuljapur Water ShortageSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: यंदाच्या उन्हाळ्यात देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. राज्यातील अनेक भागात आतापासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यात प्रामुख्याने तुळजापूर तालुक्यात संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता तालुक्यातील चार प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्देश काढले आहेत. 

राज्यात मागील वर्षी चांगला पाऊस झाला आहे. यामुळे पाणी टंचाई अधिक गडद राहणार नसल्याची शक्यता वर्तविली जात होती. असे असले तरी मार्च महिन्याची सुरवात झाल्यानंतर उन्हाच्या झळा जाणविण्यास सुरवात झाली असतानाच अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आतापासूनच आली आहे. हीच परिस्थिती धाराशिव जिल्ह्यात देखील पाण्यास मिळत आहे. 

Tuljapur Water Shortage
Tiger Attack : मासे विकून घरी परतताना घडले विपरीत; वाघाच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू

चार लघुप्रकल्पातील पाणी आरक्षित 

धाराशिव जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या पाश्र्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील चार लघुपाटबंधारे प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. उपलब्ध पाणी साठ्याचा उपसा होवु नये, पाणीपुरवठा योजना चालाव्या, जनावरांनाही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी हे पाणी राखीव ठेवण्याची गरज असल्याने आदेश दिले आहेत.

Tuljapur Water Shortage
Pune Corporation Budget : पुणेकरांना दिलासा, कोणतीही करवाढ नाही, १२६१८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

जिल्ह्यात संभाव्य टंचाई 

धाराशिव जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला होता. मात्र उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाईचा सामना करावा लागण्यास सुरवात झाली आहे. शिवाय यंदा उन्हाची तीव्रता अधिक सांगितली जात असून उन्हामुळे पाणी पातळीत घट होत असते. परिणामी पाण्याची समस्या जाणवित असते. आगामी काळात धाराशिव जिल्ह्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com