Radhakrishna Vikhe Patil : केवळ आरोप करून आरक्षण मिळणार आहे का? मंत्री विखे पाटील यांचा जरांगे पाटील यांना सवाल

Dharashiv News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले जात आहेत, यावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला
Radhakrishna Vikhe Patil Jarange patil
Radhakrishna Vikhe Patil Jarange patilSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे उद्धव ठाकरे असतील, त्यांचे नेते शरद पवार असतील यांनी आरक्षणासंदर्भात योग्य भूमिका न घेतल्याने आरक्षण घालवलं. स्वतः शरद पवारांनी अनेक वेळा सांगितले की मराठ्यांना आरक्षण देता येत नाही. त्याबद्दल जरांगे पाटील कधीच बोलत नाहीत फक्त फडणवीस यांच्यावर टीका केली की आरक्षण मिळणार आहे का? असा सवाल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा २९ ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. याच अनुषंगाने ते ठिकठिकाणी जाऊन मराठा समाज बांधवांच्या भेटीगाठी घेत असून राज्य सरकार व देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत. याच विषयावर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. 

Radhakrishna Vikhe Patil Jarange patil
Nashik Crime : रक्षाबंधनानिमित्ताने कुटुंब गावी; बंद घराचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते त्यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांच्याकडून होत असलेल्या आरोपांवर भाष्य करत जरांगे पाटील व महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तसेच शरद पवार यांच्याविषयी जरांगे पाटील का बोलत नाही? असा सवाल देखील केला आहे. 

Radhakrishna Vikhe Patil Jarange patil
Ambarnath Palika : एक महिन्यात समस्या सोडवा, अन्यथा पालिकेला टाळं ठोकू; पालिकेवर धडक देत भाजपचा इशारा

मराठा आरक्षणाबाबत महायुतीची भूमिका स्पष्ट 
मराठ्यांना आरक्षण देण्या संदर्भात मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली. शिवाय फडणवीस यांच्यावर टीका करून त्याला जातीय रंग देऊन आणि फडणवीसांचा विरोध आहे म्हणून दाखवणे चुकीचे आहे. त्यांच्या काळातच मराठ्याला आरक्षण मिळालं होतं आणि आजही महायुतीमध्ये शिंदे साहेबांनीच मराठा आरक्षणाबाबत भूमिका घेतली होती. आजही महायुतीची तीच भूमिका असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com