Ambarnath Palika : एक महिन्यात समस्या सोडवा, अन्यथा पालिकेला टाळं ठोकू; पालिकेवर धडक देत भाजपचा इशारा

Ambarnath News : अंबरनाथ शहरात असलेल्या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असून याच साठी आज भाजपकडून पालिकेवर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजपकडून एक महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे
Ambarnath BJP
Ambarnath BJPSaam tv
Published On

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये भाजपकडून आज पालिकेवर विशाल मोर्चा काढण्यात आला. अंबरनाथमधील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या एक महिन्यात सोडवा, अन्यथा पालिकेला टाळं ठोकू; असा इशारा यावेळी भाजपाचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांनी दिला आहे. भाजपच्या या मोर्चामुळे पालिका परिसर दणाणून गेला होता. 

अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून अंबरनाथ पालिकेवर हा मोर्चा काढण्यात आला. पालिकेच्या आवारात मोर्चा येताच मुख्याधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा आणत त्याला जोडे मारण्यात आले. यानंतर पालिकेच्या आत येऊन मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी पॅसेजमध्येच ठिय्या आंदोलन केलं. यावेळी चर्चा करण्यासाठी आलेल्या उपमुख्याधिकाऱ्यांवर भाजपा कार्यकर्त्यांनी खोट्या नोटा फेकत निषेध केला. 

Ambarnath BJP
Cyber Crime : डिजिटल अरेस्ट करत वृद्धाला गंडविले; ३१ लाखात फसवणूक, ओरिसातून संशयित ताब्यात

तर मुख्याधिकाऱ्यांना १ लाख रुपये देऊ 

दरम्यान अंबरनाथ पालिकेत मोठा गोलमाल सुरू असून कामं न करता खोटी बिलं काढली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आले. कार्यकर्ते समस्या सोडवण्यासाठी पालिकेत हेलपाटे मारतात, पण कामं होत नाही. शहरातल्या सार्वजनिक शौचालयांची अवस्था बिकट असून मुख्याधिकाऱ्यांनी हे शौचालय वापरून दाखवल्यास एक लाख रुपये देऊ, असं आव्हान गुलाबराव करंजुले यांनी दिल आहे. 

Ambarnath BJP
Nashik Crime : रक्षाबंधनानिमित्ताने कुटुंब गावी; बंद घराचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास

एक महिन्याचा दिला अल्टिमेटम 

तसेच शहरातील भाजी मार्केट १९७२ साली उभारलं असून त्याची इमारत जीर्ण होऊनही पुनर्विकास होत नाही. डांबरीकरण केलेल्या रस्त्यांना चार महिन्यात खड्डे पडतात. ही परिस्थिती एक महिन्यात बदलली नाही, तर पालिकेला टाळं ठोकू, असा इशारा यावेळी करंजुले यांनी दिला. या मोर्चाला भाजपाचे नेते शशिकांत कांबळे, नंदू परब, अभिजित करंजुले, विश्वजित करंजुले, प्रजेश तेलंगे, लक्ष्मण पंत, भाजपाचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com