Dharashiv News
Dharashiv NewsSaam tv

Dharashiv News : संतापजनक! शिक्षकाने विद्यार्थीनीला पाठवले अश्लील मेसेज, पालकांचा राग अनावर, पोलिसांनी २ तास ठोकल्या बेड्या

Dharashiv News : शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा ईस्टाग्राम, स्नॅपचॅटवर या शिक्षकाने आक्षेपार्ह मॅसेज पाठविला.
Published on

बालाजी सुरवसे 

धाराशिव : मुलीवरील अत्याचाराच्या घटना राज्यात गाजत आहेत. अशातच एका शिक्षकाने आपल्याच शाळेतील एका विद्यार्थिनीला आक्षेपार्ह मॅसेज पाठविल्याचे प्रकार धाराशिवच्या भुम तालुक्यात समोर आला आहे. या प्रकरणी शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

धाराशिवच्या (Dharashiv News) भूम तालुक्यातील आंतरगाव येथील माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकाने हा प्रकार केला आहे. शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा ईस्टाग्राम, स्नॅपचॅटवर या शिक्षकाने आक्षेपार्ह मॅसेज पाठविला. यात शिक्षक धनंजय शिंदे याने अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर तू मला आवडतेस, तुझ्याशी लग्न करायचे आहे असे मेसेज पाठविला. हा मॅसेज एकदाच नाही तर वेळोवेळी पाठवून मुलीला त्रास देत छळ केला. या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने पोलिसात (Police) तक्रार दिली.   

Dharashiv News
Leopard Attack : घराबाहेर कपडे धुणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ला; महिलेचा मृत्यू

विद्यार्थिनीला मेसेज पाठवुन छळ केल्याप्रकरणी शिक्षक शिंदे याच्या विरूद्ध परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरिक्षक विनोद इज्जपवार यांच्या पथकाने या शिक्षकास दोन तासाच्या आत अटक केली. यानंतर आरोपीस परंडा न्यायालयात हजर केले असता शिक्षकाची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com