Bachchu Kadu: माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह पाच जण निर्दोष; २०१५ मधील आंदोलनात पोलिसांशी हुज्जत घातल्याचा होता आरोप

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह पाच जणांची निर्दोष मुक्तता; २०१५ मधील आंदोलनात पोलिसांशी हुज्जत घातल्याचा होता आरोप
Bachchu Kadu
Bachchu KaduSaam tv

कैलास चौधरी

धाराशिव : माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन करताना पोलिसांची हूज्जत घातली होती. याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातून धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने कडू यांच्यासह अन्य ४ आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. यात केवळ अडीच हजार रुपयांचा दंड आमदार कडू (Bachchu Kadu) यांना भरावा लागणार आहे. (Breaking Marathi News)

Bachchu Kadu
Baramati News: १०० किलो वांग्याचे मिळाले केवळ ६६ रुपये; शेतकऱ्याने वांग्याचे पीक टाकले उपटून

प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये नोव्हेंबर २०१५ ला आंदोलन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांगांसाठी राखीव ठेवलेला तीन टक्के निधी खर्च न करण्यात आल्यामुळे त्यांनी आंदोलन केले होते. याप्रसंगी कडू यांच्यासह आंदोलक थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात शिरले. यामुळे पोलिसांनी त्यांना (Usmanabad News) अडवण्याचा प्रयत्न केला. एका पोलीस अधिकाऱ्याबरोबर आमदार कडू यांनी हुज्जत घातली होती. तसेच त्यांनी अर्वाच्य भाषेत पोलिसांना शिवीगाळ केली, असा आरोप करत याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

याप्रकरणी उस्मानाबाद जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांच्या न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यामध्ये बच्चू कडू यांच्यासह प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत जाधव, बलराज रणदिवे यांनाही न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. आरोपींच्यावतीने ऍड. जे. एस. पठाण, ॲड. मिराजी मैदाड, ऍड. संतोष शिंदे, संजय चादरे यांनी युक्तिवाद केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com