Dharashiv Burning Car News: धावत्या कारने अचानक घेतला पेट! मोठा अनर्थ टळला; आगीत गाडी जळून खाक

Burning Car News: यावेळी प्रसंगावधान राखून कार चालकाने कार थांबवली व प्रवाशांना तात्काळ उतरायला सांगितले; त्यामुळे चार जण थोडक्यात बचावले आहेत.....
Burning Car News
Burning Car NewsSaamtv
Published On

बालाजी सुरवसे, प्रतिनिधी...

Hyderabad- Solapur Road News: सध्या राज्यात वाढत्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. जून महिना आला तरी राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. याच वाढत्या तापमानामुळे हैद्राबाद- सोलापूर महामार्गावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. अचानक पेट घेतल्याने ही कार पुर्णपणे जळून खाक झाली असून कारमधील चारजण थोडक्यात बचावले आहेत. (Burning Car On Hyderabad- Solapur Road)

Burning Car News
Children Drowned Lake : पालखी सोहळ्यासाठी गावी गेले, ते परतलेच नाही; बीडमध्ये 2 चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, वाढत्या तापमानामुळे चालती कार अचानक पेंट घेतल्याने कार जळून खाक झाली असून या कारमधील चार प्रवासी प्रसंगावधानाने थोडक्यात बचावले आहेत.सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास हैदराबाद - सोलापूर मार्गावरील लोहरा तालुक्यातील भोसगा पाटीजवळ घडली आहे.

दुपारी अडीचचच्या सुमारास कर्नाटक पासिंग असलेली रेनॉल्ट डस्टर कार (केए ५१-एमएफ -५९५४) सोलापूरहुन- गुलबर्गाकडे जात होती. दुपारी अडीचच्या सुमारास हैदराबाद - सोलापूर मार्गावरील भोसगा पाटीजवळ कारने अचानक पेट घेतला. यावेळी प्रसंगावधान राखून कार चालकाने कार थांबवली व प्रवाशांना तात्काळ उतरायला सांगितले. यामुळे कारमधील चारही प्रवाशांचे जीव वाचले आहेत. (Accident News)

Burning Car News
Alandi Wari News : ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी करावं, पण...; चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना टोला

दरम्यान, घटनेनंतर येथील नागरिक व कार प्रवाशांनी पेटलेली कार विजवण्याचा प्रयत्न केला परंतु चारी टायर व तेलाच्या टाकीचा टप्प्याटप्प्याने स्फोट झाल्याने आग आटोक्यात आली नाही. या आगीत ही कार जळून खाक झाली आहे. सुदैवाने प्रसंगावधानामुळे प्रवाशांचा जीव वाचला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com