Sina- Kolgaon Project : सीना- कोळगाव प्रकल्पात १४ टक्के मृत पाणीसाठा; पिण्यासाठी केला राखीव

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात मागील वर्षी पावसाने हुलकावणी दिल्यानंतर खरीप हंगामातील पिके वाया गेली. पाऊस कमी झाल्याने प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा जमा झाला नाही.
Sina- Kolgaon Project
Sina- Kolgaon ProjectSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : यंदा पावसाळा कमी झाल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे परंडा तालुक्यातील (Dharashiv News) सिना कोळेगाव प्रकल्पात केवळ १४ टक्के मृत पाणीसाठा शिल्लक राहीला असुन आता हा पाणीसाठा पिण्यासाठी राखीव करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Sina- Kolgaon Project
Onion Price : कांद्याची आवक वाढल्याने दरात घसरण; सोलापूर बाजार समितीतील चित्र

धाराशिव जिल्ह्यातील परंडा (Paranda) तालुक्यात मागील वर्षी पावसाने हुलकावणी दिल्यानंतर खरीप हंगामातील पिके वाया गेली. पाऊस कमी झाल्याने प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा जमा झाला नाही. यामुळे आता प्रकल्पातील असलेला पाणीसाठा देखील कमी होऊ लागला आहे. यात तालुक्यातील एकमेव सिना- कोळेगाव प्रकल्पात १४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे या भागात भीषण पाणी टंचाईला (Water Scarcity) सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sina- Kolgaon Project
Bank Vehicles GPS system : पैशाची वाहतुक करणार्‍या बँक वाहनांना जीपीएस सिस्टीम; लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सक्ती

उपसा न करण्याबाबत गावांना नोटीस 

परंडा तालुक्यातील साकत, चांदणी, खासापुरी मध्यम प्रकल्पासह निम्मखैरी भुतलघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. जलसंकट येवु नये यासाठी सिना कोळेगावमधील पाणी आरक्षित करण्यात आले आहे. दरम्यान या पाण्याचा उपसा होवु नये; यासाठी संबधित भागातील गावांना प्रशासनाने नोटीसा दिल्या असुन शेतीसाठी पाणी वापरल्यास मोटार जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com