Dharashiv News : धाराशिवमधील रुग्णसेवा सोमवारपासून कोलमडणार? डॉक्टर संघटनेकडून कामबंदचा इशारा

Dharashiv Doctors Strike News : तेरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर जिल्ह्यातील डॉक्टर संघटना आक्रमक झाली आहे.
Dharashiv Doctors called off Strike News
Dharashiv Doctors called off Strike NewsSAAM TV

बालाजी सुरवासे, धाराशिव

Dharashiv Doctors call Strike News : धाराशिव जिल्ह्यातील रुग्णसेवा सोमवारपासून कोलमडण्याची शक्यता आहे. तेरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर जिल्ह्यातील डॉक्टर संघटना आक्रमक झाली आहे. मारहाण करणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई न झाल्यास कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.  (Latest Marathi News)

धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका वैद्यकीय अधिकाऱ्याला ग्रामस्थांकडून मारहाण झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील डॉक्टर संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेने या घटनेचा निषेध नोंदवला आहे. संबंधितांवर अटकेची कारवाई झाली नाही तर, सोमवारपासून कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.

Dharashiv Doctors called off Strike News
Joshi Bedekar College : ठाण्यात जोशी-बेडेकर कॉलेजच्या NCC विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, पोलिसांकडून चौकशी

डॉक्टरांच्या संघटनेने यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे. यावेळी संघटनेतील सदस्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला. तसेच निषेधाच्या घोषणा दिल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई न झाल्यास कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

Dharashiv Doctors called off Strike News
Free Treatment In Public Hospitals: सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत उपचार; सरकारच्या निर्णयाचा कुणाकुणाला मिळणार लाभ?

मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा, पोलीस तपास सुरू

तेरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली होती. वैद्यकीय अधिकारी नवनाथ घुले यांना ग्रामस्थांनी मारहाण केली होती. हाताला लागले आहे, पट्टी बदलायची. तू इथे का नव्हतास असं म्हणत त्यांनी घुले यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर त्यांना मारहाण केली. या प्रकरणी आरोपी सचिन उकरांडे, धनंजय मस्के, बाळू पौळ यांच्या विरोधात येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com