Dharashiv Crime: कोयत्याचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर दरोडा; 15 दिवसातील दुसरी घटना, परिसरात खळबळ

Crime News: गेल्या पंधरा दिवसात कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा दुसरा दरोडा पडल्याने एकच खळबळ माजली आहे. गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस नेमकं काय करतायत असा सवाल सर्वसामान्य उपस्थित करत आहेत.
Dharashiv Crime
Dharashiv CrimeSaam TV
Published On

Dharashiv News:

धाराशिव जिल्ह्यातील मस्सा येथे कोयत्याचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर दरोडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. मस्सा येथील समर्थ पेट्रोलियम येथे रात्री 12 वाजेच्या सुमारास चार जणांनी कोयत्याचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरिल दोन कामगारांना मारहाण केली. तसेच दोन मोबाईलसह ४५ हजाराची रोख रक्कम लंपास केलीय.

Dharashiv Crime
Dharashiv : दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये सांगली- कोल्हापुरातील पुराचे पाणी आणणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

गेल्या पंधरा दिवसात कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा दुसरा दरोडा पडल्याने एकच खळबळ माजली आहे. गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस नेमकं काय करतायत असा सवाल सर्वसामान्य उपस्थित करत आहेत. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीसांकडून पुढील तपास करण्यात येतोय.

काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड शहरात देखील अशीच एक घटना घडली होती. वाकड परिसरातील मेडिकल दुकानदाराला धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्याची रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सात फेब्रुवारीला आशिष दिलीप शहा हे त्यांच्या कलाटे नगर भागातील चंदन फार्मसी मेडिकल बंद करून जात होते. त्यावेळी ५ अनोळखी इसमांनी त्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या ताब्यातील 45 हजार 560 रुपये रक्कम दरोडा टाकून पळवून नेली होती.

यावेळी आरोपींनी तोंडाला मास्क लावल असल्याने त्यांची ओळख पटविण्याचा मोठा आव्हान पोलिसांसमोर होतं. वाकड पोलिसांनी कौशल्य पूर्ण तपास करत या गुन्ह्यातील चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

Dharashiv Crime
UP Crime News: संशयाचं भूत शिरलं, पत्नीचं शीर धडावेगळं केलं; बाराबंकीतील थरकाप उडवणारी घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com