Dharashiv Breaking: तुळजाभवानी देवीला चॉकलेटचा हार घातल्याने नवा वाद; पुजाऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा VIDEO

Controversy Over Wearing Tuljapur Devi Chocolate Necklace: तुळजापुरात देवीला चॉकलेटचा हार घातल्यामुळे पुजारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
तुळजापुरात देवीला चॉकलेटचा हार
Wearing Tuljapur Devi Chocolate NecklaceSaam Tv

बालाजी सुरवसे, साम टीव्ही धाराशिव

धाराशिवमधून मोठी बातमी समोर आली आहे. तुळजापूर देवीला चॉकलेटचा हार घातल्याचे प्रकारावरुन वादंग सुरू झालंय. पुजारी मंडळाने आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. तुळजाभवानी देवीला चॉकलेटचा हार घातल्याने नवा वाद सुरू झाल्याची घटना घडली. यामुळे पुजाऱ्यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर शहरातील वातावरण देखील तापलं आहे.

नेमकं काय घडलं?

तुळजापुरमध्ये एका भाविकाने तुळजाभवानी देवीसाठी चॉकलेटचा हार आणला (Dharashiv Breaking) होता. भाविकाने दिलेला हा चॉकलेटचा हार हार पुजाऱ्याने मंदीर संस्थांच्या परवानगीने देवीला घातल्याचा दावा केला जात आहे. परंतु यावरून नवीन वाद उद्भवण्याची चिन्हे दिसत आहे. यावर पुजारी मंडळाने आक्षेप घेतला आहे. त्यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिल्याची माहिती मिळतेय.

पुजारी मंडळाचं नेमकं म्हणणं काय?

पुजारी मंडळ याप्रकरणी म्हणतंय की, देवीचा गाभारा हा ऐतिहासिक आहे. नवनवीन प्रथा नको. मंदीरासाठी देऊळ कवायत कायदा लागु असताना असे चुकीचे प्रकार घडत आहे.याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष (Tuljapur Devi Chocolate Necklace) द्यावं, अशी मागणी पुजारी मंडळाने केली आहे. देवीच्या मंदिराचा गाभारा फुलांचे हार आणि फळांनी सजवला जातोय, तो तसाच ऐतिहासिक राहावा, अशी भूमिका पुजारी मंडळाची आहे.

तुळजापुरात देवीला चॉकलेटचा हार
Ekvira Devi : कार्ला गडावर 'आई राजा उदो उदो' चा गजर, लाखाे भाविकांच्या उपस्थित एकवीरा देवीचा पालखी साेहळा संपन्न

देवीला चॉकलेटचा हार घातल्याची घटना

पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी केली (Tuljapur Devi Chocolate Necklace Controversy) आहे. देवाला फुलांचा, रत्नाचा, सोन्या-चांदीचा हार घातल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. परंतु चॉकलेटचा हार घातल्याची घटना प्रथमच कानावर पडतेय. त्यामुळे आता वाद उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात (Tuljabhavani) आहे. तुळजाभवानी मंदीराचे पावित्र्य राखले गेले पाहीजे. चॉकलेटचा असा हार देवीला घालणे योग्य नाही, असा प्रकार पुन्हा होवु नये याकडे मंदीर संस्थांनचे लक्ष दिले पाहिजे, असं म्हणत भाविकांनी देखील या प्रकराबद्दल नाराजी व्यक्त केलीय.

तुळजापुरात देवीला चॉकलेटचा हार
Kolhapur Ambabai Devi: अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण; डोळ्यांत साठवून ठेवावं असं विलोभनीय रूप, EXCLUSIVE व्हिडिओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com