Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam TV

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी गायलं 'श्रीवल्ली' गाणं; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

Devendra Fadnavis Viral Video: चक्क देवेंद्र फडणवीसांनी देखील या गाण्यातील काही ओळी गायल्यानं सर्वत्र याची चर्चा होताना दिसतेय.
Published on

Viral Video:

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीच राजकारणातील विविध गोष्टींमुळे चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर फडणवीसांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी टॉलिवूड चित्रपटातील एक सुपरहीट गाणं गायलंय.

Devendra Fadnavis
Viral Video: 'कोहली को बॉलिंग दो..'LIVE सामन्यात फॅन्सची मागणी! विराटच्या खास अंदाजाने जिंकले मन,Video

देवेंद्र फडणवीसांनी चक्क अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यातलं एक कडवं गायलंय. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते. कार्यक्रमात सिंगर जावेद अली श्रीवल्ली हे गाणं गात होता.

त्यावेळी देवेंद्र फडणवीसही जावेद अलीच्या सुरात सुर मिसळताना दिसलेत. देवेंद्र फडणवीसांचा गाणं गातानाचा हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झालाय. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला होता. सर्वांनीच या चित्रपटाला डोक्यावर घेतलं होतं. चित्रपटातील डायलॉगसह सर्वच गाणीही सुपरहीट ठरली. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींचे देखील सोशल मीडियावर श्रीवल्ली गाण्याचे रील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अशात चक्क देवेंद्र फडणवीसांनी देखील या गाण्यातील काही ओळी गायल्यानं सर्वत्र याची चर्चा होताना दिसतेय.

राजकारणी व्यक्ती आपल्या कामाच्या ओघात कायमच माध्यमांसमोर येत असतात. यामध्ये कधी शासनाच्या विविध योजना सांगितल्या जातात तर कधी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसतात. अशात जेव्हा राजकारणातल्या एखादी मोठी व्यक्ती गाणं गातात तेव्हा हे सर्वांसाठीच चकीत करणारं ठरतं.

Devendra Fadnavis
Woman Argument the students Viral Video: धावत्या बसला लटकून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिलेनं घडवली अद्दल, VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com