फडणवीस-शिंदे-पवारांनी निवडणुकीत १५ हजार कोटी उडवले; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारा दावा कोणी केला?

sanjay raut alleges 15000 crore spent by fadnavis shinde pawar : महाराष्ट्रातील नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा दावा केला आहे.
फडणवीस-शिंदे-पवारांनी १५ हजार कोटी उडवले, संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Devendra Fadnavis, Eknath Shinde and ajit Pawarsaam tv
Published On

मयूर राणे, मुंबई

राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर त्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना असून, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनंही चांगलं यश मिळवलं आहे. महायुतीतील मित्रपक्षांच्या या यशानंतर प्रमुख नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. नगरपरिषद निवडणुकांमध्ये फडणवीस, शिंदे आणि अजित पवार या तीन नेत्यांनी मिळून १५ हजार कोटी रुपये उडवले आहेत, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले? ठळक मुद्दे

  • हॅट्रिक, मॅट्रिक आहे, पण नगरपरिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मिळून पंधरा हजार कोटी उडवले आहेत.

  • मतदारांना पाण्यासारखे पैसे वाटले.

  • देवेंद्र फडणवीस बोलत आहेत आम्हाला अभूतपूर्व विजय मिळाला. ही अभूतपूर्व पैसे वाटल्याची किमया आहे.

  • शिंदे बोलत आहेत आमची शिवसेना खरी आहे. तर मग जाऊन अमित शहा यांचे पाय धुवून तीर्थ प्या.

  • शिवसेना तुम्हाला अमित शहा यांनी दिली. ते शिवसेनेचे पुण्य खूप मोठे आहे. ते पुण्य तुम्हाला मिळत आहे.

  • चिन्ह आणि पक्षाचा निर्णय अद्याप सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यावर अजून निर्णय देत नाही. कारण सुप्रीम कोर्टावर दबाव आहे.

  • माणिकराव कोकाटेंवर सहा तासांत निर्णय देतात आणि ४० आमदार ज्यांनी पक्ष बदलला, त्यांच्याबाबत संविधान आणि कायद्याच्या अखत्यारित राहून न्यायालय अद्याप निर्णय देत नाही.

  • आता तारीख आहे २१ जानेवारी. म्हणजे निवडणुकीनंतर. ही निवडणूक देखील तुम्ही गिळंकृत करा.

शिवसेना-मनसे युतीवर काय म्हणाले?

  • शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील चर्चा संपली आहे.

  • लहान-मोठ्या गोष्टी आहेत. मनसे नेते मातोश्रीवर गेले होते. सकाळीच माझेही राज ठाकरे यांच्याशी बोलणे झाले.

  • फक्त मुंबई नाही; ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे, मीरा-भाईंदर आणि इतर ठिकाणचेही बघायचे आहे.

  • दोघांकडे देखील कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. सगळ्यांना सांभाळून घ्यायचे आहे.

  • कोणावर अन्याय व्हायला नको. कारण महाराष्ट्रात ऐतिहासिक घोषणा होणार आहे. आज संध्याकाळपर्यंत सगळं काही संपून जाईल.

फडणवीस-शिंदे-पवारांनी १५ हजार कोटी उडवले, संजय राऊतांचा खळबळजनक दावा
'थेट' भाजपच अव्वल! आतापर्यंत सर्वाधिक १०८ नगराध्यक्ष, एकनाथ शिंदेंची शिवसेना कितव्या स्थानी?

एकनाथ शिंदेंना टोला

एकनाथ शिंदे यांनी टांगा पलटी, घोडे फरार असा वारंवार उल्लेख करून ठाकरेंच्या शिवसेनेसह विरोधकांवर हल्लाबोल केला होता. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. टांगा पलटी, घोडे फरार असं मी खूप ऐकलं आहे. हे आमचं हेडिंग आहे एकेकाळचं. जेव्हा आम्ही काँग्रेसचा पराभव केला होता, त्या काळात टांगा पलटी, घोडे फरार अशी हेडिंग केली होती, असा टोला त्यांनी शिंदेंना लगावला.

फडणवीस-शिंदे-पवारांनी १५ हजार कोटी उडवले, संजय राऊतांचा खळबळजनक दावा
राहुल गांधी, सोनिया गांधींना मोठा झटका; नॅशनल हेराल्ड प्रकरणी ED च्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाची नोटीस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com