Devendra Fadnavis: बालबुद्धीवर काय बोलणार? देवेंद्र फडणवीस यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका

Shivaji Maharaj Tiger Claw: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.
Aaditya Thackeray - Devendra Fadnavis
Aaditya Thackeray - Devendra Fadnavissaam tv
Published On

गिरीश कांबळे

Devendra Fadnavis On Aditya Thackeray:

छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांनी अफजल खानाचा वध केला होता. ती वाघनखे येत्या १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत आणली जाणार आहेत. यावरून शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्या ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केलेत. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. (Latest Marathi News)

Aaditya Thackeray - Devendra Fadnavis
Nana Patekar News: 'वाघनखे आणताय त्याबद्दल अभिनंदन, जमलं तर...' अभिनेते नाना पाटेकर यांचा भाजपवर प्रहार; नेमकं काय म्हणाले?

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

वाघनखांवरून सध्या राजकीय वादळ उठल्याचं पाहायला मिळत आहे. संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केल्यावर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर टीका केली आहे. "त्यांच्या बोलण्याचं मला आश्चर्य वाटत नाही. कारण संजय राऊतांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनाच पुरावे मागितले होते. त्यामुळे ही त्यांची परंपरा आहे."

पुढे आदित्या ठाकरेंवर बोलताना फडणवीस म्हणाले की, " मी बालबुद्धीवर काय बोलणार, त्यामुळे यावर मी उत्तर देत नाही." आदित्य ठाकरेंच्या प्रश्नांना बालबुद्धी म्हणत फडणवीसांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

"लोनवर आहे की परतावा? ही वाघनखे शिवकालीन आहेत का? ती खरी आहेत का? असे प्रश्न आदित्य ठाकरेंनी सरकारला विचारले आहेत.

वाघनखे सध्या लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. मुंबईत वाघनखे आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करण्यात आला असून पुढील तीन वर्षांसाठी वाघनखे महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Aaditya Thackeray - Devendra Fadnavis
#Shorts : Aaditya Thackeray News : राऊतांच्या गणपती बाप्पाचे आदित्य ठाकरेंनी घेतले दर्शन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com