-- राजेश भोस्तेकर
रायगड : अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या आमदार म्हणून माझ्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या असल्याही पाहिजेत. अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या असलेल्या आशा पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. दोन वर्षांपासून संकट काळ असूनही मतदार संघातील पर्यटन, रस्ते, पाणी तसेच विविध विकास कामासाठी करोडोचा निधी उपलब्ध केला आहे. रेवस करंजा हा महत्वपूर्ण पुलाची मान्यताही घेतली आहे. मतदार संघात येत असलेल्या औदयोगिक प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य कसे राहील यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे आमदार महेंद्र दळवी यांनी प्रतिक्रिया दिली. आमदारकीची दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दळवी यांची भेट घेण्यासाठी शिवसैनिक, पदाधिकारी, नागरिक यांनी गर्दी केली होती.
हे देखील पहा :
24 ऑक्टोबर 2019 ला विधानसभेचा निकाल लागला आणि अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे महेंद्र दळवी आमदार म्हणून निवडून आले. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात पहिल्यांदाच दळवी याच्या रूपाने भगवा फडकला. त्यामुळे शिवसैनिकामध्ये नवचैतन्य निर्माण झाले. आज 24 ऑक्टोबर 2021 रोजी महेंद्र दळवी याच्या आमदारकी काळाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. दोन वर्ष काळात अलिबाग मुरुड मतदारसंघात विविध विकासकामे आमदार महेंद्र दळवी यांनी प्रस्तावित केली आहेत.
अलिबाग मुरुड हे पर्यटन तालुके आहेत. त्यामुळे या तालुक्यांना पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. पर्यटनवाढीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 173 कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे. रेवस करंजा हा महत्वकांक्षी पूल गेली अनेकवर्षं रखडलेला होता. आमदार झाल्यानंतर या पुलाला मान्यता मिळवून निधीही मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच अलिबाग हा पुलाच्या माध्यमातून मुंबईला जोडला जाणार आहे. अलिबाग तालुक्यात शेकापची सत्ता अनेक वर्षे असताना पाणी समस्या आजही पाहायला मिळत आहे. पाणी समस्या कायम स्वरूपी मिटविण्यासाठी 20 कोटींची पाणी योजना मंजूर केली असून लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार आहे. मतदार संघातील रस्ते, वीज, पाणी या मुलभुत समस्याही सोडविण्यासाठी आमदार म्हणून काम करीत आहे. अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र दळवी यांनी दिली.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.