उपजिल्हाधिका-यांच्या खांद्यावर हात ठेवत विचारले येतेस का? प्रतिकार करीत हल्लेखाेरांना लावले त्यांनी पळवून

आज पहाटेच्या सुमारास सांगलीत घडली घटना.
harshlata gedam, sangli crime news
harshlata gedam, sangli crime newssaam tv
Published On

सांगली (sangli latest marathi news) : जॉगिंगसाठी गेलेल्या (sangli) उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम (harshlata gedam) यांच्यावर आज (शुक्रवार) अज्ञातांनी हल्ला केला. मार्शल आर्टमध्ये तरबेज असलेल्या गेडाम यांनी हा हल्ला परतावून लावत दाेघांना घटनास्थळावरुन पळवून लावले. दरम्यान गेडाम यांनी या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात (police) तक्रार नाेंदवली आहे. पाेलीसांनी दाेन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करीत तपासाची चक्रे फिरवली आहेत. (harshlata gedam latest marathi news)

आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या घटनेबाबत हर्षलता गेडाम यांनी साम टीव्हीला माहिती देताना मी नेहमीप्रमाणे जॉगिंगसाठी विश्रामबागच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर गेले हाेते. तेथे धावत असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी माझी छेड काढली असे सांगतिले. त्या म्हणाल्या माझ्या दंडाला हात लावून त्यांनी मला ओढत "चलतेस का"? अशी विचारणा केली. स्वतःला वाचविण्यासाठी मी त्यांना प्रतिकार केला.

harshlata gedam, sangli crime news
कर्जदारांना फटका; देशातील सात बॅंकांनी वाढविला व्याजदर

ज्याने मला हात लावला हाेता त्याला मी लाथ मारून खाली पाडले. त्यातच दुसऱ्याने चाकूने माझ्यावर हल्ला केला. त्यामुळे माझ्या हातास जखम झालीे. मार्शल आर्टमध्ये तरबेज असलेल्या गेडाम यांनी स्वतःचा वाचविण्यासाठी दाेघांवर प्रतिहल्ला करीत त्यांना पळवून लावले.

harshlata gedam, sangli crime news
एकुंडी हादरलं; लग्नानंतर सहा दिवसांत अश्विनीने प्रियकरासमवेत संपवलं जीवन

दरम्यान यापुर्वी देखील संबंधित व्यक्तीने माझा पाठलाग करुन मला त्रास देण्याचा प्रयत्न केला हाेता. त्यावेळी मी त्याकडे दुर्लक्ष केले होते. आज पुन्हा त्याच व्यक्तीने माझी छेड काढत माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने मी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार नाेंदवली आहे असे गेडाम यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

harshlata gedam, sangli crime news
मित्रांसमवेत फिरायला गेलेल्या मुलीचा धरणाच्या डाेहात बुडून मृत्यू; भागवत कुटुंबावर शाेककळा
harshlata gedam, sangli crime news
इंग्लंड विरुद्धच्या सामन्यापुर्वी न्यूझीलंडला बसला मोठा धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com