मंदिरं खुली करण्यासाठी भाजपाच्या अध्यात्म आघाडीकडून सरकार विरोधात निदर्शनं

मंदिरं खुली करावीत या मागणीसाठी सांगलीमध्ये भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं आहे.
मंदिरं खुली करण्यासाठी भाजपाच्या अध्यात्म आघाडीकडून सरकार विरोधात निदर्शनं
मंदिरं खुली करण्यासाठी भाजपाच्या अध्यात्म आघाडीकडून सरकार विरोधात निदर्शनंविजय पाटील
Published On

सांगली : मंदिरं खुली करावीत या मागणीसाठी सांगलीमध्ये भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं आहे. शहरातल्या मारुती मंदिरासमोर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निदर्शनं करत तातडीनं मंदिरं खुली करावीत अशी मागणी करण्यात आली आहे. तर घंटानाद करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे. (Demonstration against the government by BJP's spiritual front to open temples)

हे देखील पहा -

सांगली जिल्ह्यातली मंदिरं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद आहेत. मात्र राज्य सरकारकडून सातत्याने लावण्यात येणाऱ्या चुकीच्या लॉकडाऊनमुळे मंदिरं बंदच असून त्याचा परिणाम या मंदिरावर अवलंबून असणारे छोटे-मोठे व्यवसायिक, पुजारी, गुरव यांच्या कुटुंबांवर होत आहे. परीणामी मंदिरावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे असा आरोप भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीकडून करण्यात आला आहे. सरकारच्या धोरणाविरोधात सांगली शहरामध्ये आंदोलन करण्यात आले आहे. शहराच्या मारुती चौक येथील मारुती मंदिरासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. घंटानाद करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.

मंदिरं खुली करण्यासाठी भाजपाच्या अध्यात्म आघाडीकडून सरकार विरोधात निदर्शनं
खळबळजनक ः गोंदियात व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या

एका बाजूला राज्य सरकारकडून दारू दुकानांना परवानगी देण्यात आली, मात्र आस्थेचे स्थान असणारी मंदिरं मात्र बंदच ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे तातडीने महाविकास आघाडी सरकारने मंदिरं खुली करण्याच्या बाबतीत पाऊलं उचलावीत अन्यथा यापुढील काळात भाजपच्या अध्यात्मिक सेलकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपचे नेते माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com