सेनेविरुद्ध लिहिल्याने साहित्यिकाच्या अटकेची मागणी, शिवसैनिकांनी वडिलांना धमकी दिल्याचा उमरीकरांचा आरोप (पहा Video)

'मला हा विषय वाढवायचा नव्हता म्हणुन शांत राहिलो. या प्रकरणाची कुठे वाच्यता केली नाही. पण आता 'सामना'ने भडक बातमी देवुन प्रकरण चव्हाट्यावर आणले आहे म्हणुन मी पण माझी भुमिका जाहिर मांडतो.'
Literature Vs Shivsena
Literature Vs Shivsenaमाधव सावरगावे

औरंगाबाद : सोशल मीडियावर शिवसेनेच्या (Shivsena) विरोधात लिहिले म्हणून साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत उमरीकर (Srikanth Umarikar) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी तक्रार शिवसैनिकांनी औरंगाबादच्या मुकुंदवाडी आणि क्रांतीचौक पोलीस ठाण्यात केली आहे. अनेक महिन्यांपासून श्रीकांत उमरीकर यांनी फेसबुक, यूट्यूबसारख्या सोशल मीडियावर (Social Media) शिवसेनेच्या विरोधात आक्षेपार्ह लेखन करीत असल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

त्यांच्या FB पोस्टमुळे सामाजिक तेढ निर्माण होत असल्याने त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अन्यथा शिवसेना आंदोलनात उतरेल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. तर दुसरीकडे माझ्या विरूद्ध शिवसैनिकांनी विविध पोलीस स्टेशनांत तक्रारी दाखल केल्यात. काल मी सापडलो नाही तर माझ्या ८५ वर्षे वयाच्या वृद्ध वडिलांना घरी येवून धमक्या दिल्या. मला हा विषय वाढवायचा नव्हता म्हणुन शांत राहिलो. या प्रकरणाची कुठे वाच्यता केली नाही. पण आता सामनाने भडक बातमी देवुन प्रकरण चव्हाट्यावर आणले आहे म्हणुन मी पण माझी भुमिका जाहिर मांडतो, अशी फेसबुक पोस्ट (Facebook Post) टाकून श्रीकांत उमरीकर यांनी आपली भूमिका सांगितलीय.

पहा व्हिडीओ -

त्या पोस्टमध्ये भ्रष्ट निकम्म्या राज्यकर्त्यां विरोधात आवाज उठवल्या शिवाय मी शांत बसणार नाही. कुठल्याही कायदेशीर कारवाईला तोंड देण्याची माझी तयारी आहे. कालच उस्मानपुरा पोलीस स्टेशनात पोलीस अधिकाऱ्यांना वकिलाला सोबत घेवून भेटून आलो आहे. मी सर्वसामान्य जनतेची भावनाच माझ्या "उसंतवाणी" मधुन मांडतो आहे. आणि ती मांडतच राहिल. माझ्या घरी येवुन धमकी दिल्याने मी घाबरणारा नाही. मी सुखरूप आहे. काळजी नसावी. अनोळखी Mobile Number वरचे फोन सध्या स्विकारत नाहीये. धमक्यांचे फोन Block करतो आहे. कुण्या हितचिंतकाने अनोळखीच्या नंबरवरून फोन केल्यास दिलगिरी व्यक्त करतो असा मजकूर त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर लिहिलय.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com