दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील भीषण स्फोटाचं आता महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय.. त्यामुळं राज्यातील यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत... कारण डॉक्टर शाहीनाने मुंब्र्यातील नेत्र रोग तज्ज्ञ जफर हयात नावाच्या व्यक्तीसोबत लग्न झाल्याचं समोर आलंय... मात्र 2015 मध्येच जफर हयात आणि शाहीनाचा घटस्फोट झाला... या घटस्फोटाचं कारण जफर यांनी स्पष्ट केलंय..
डॉ. शाहीनाच्या घटस्फोटाचं कारण ठरला तो डॉ. मुजम्मील.... सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर मुजम्मीलसोबत अफेअर असल्यानेच शाहीनाने जफर हयातला घटस्फोट दिला... आणि त्यानंतर ती मुजम्मीलसोबत हरियाणातील अल फलाह विद्यापीठाशी जोडली गेली... आणि इथंच रचला गेला देशाशी गद्दारीचा कट.....मात्र त्याचा सुगावा सुरक्षा यंत्रणांना लागला.. आणि सुरक्षा यंत्रणांनी 2900 किलो अमोनियम नायट्रेट आणि स्फोटकं आढळून आली...त्या प्रकरणात आधी 2 डॉक्टरांना अटक केली...
आणि त्यामुळेच आपला भांडाफोड होणार या भीतीने डॉ. उमरने दिल्लीत आत्मघातकी स्फोट घडवला... याच दिल्ली स्फोटानंतर लखनऊमधून जैश ए मोहम्मदच्या महिला विंगची भारतीय कमांडर डॉ. शाहीनाच्या मुसक्या आवळल्या.. आणि त्यानंतर शाहीनाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय... त्यामुळे सावध झालेल्या महाराष्ट्र ATS ने पुणे, मुंबईत छापेमारी केली... त्यात अल कायदाशी संबंधित सीक्रेट मीटिंग्जची कागदपत्र जप्त करण्यात आली.. त्यामुळे उर्दू शिक्षक इब्राहिम अबीदीच्या मुसक्या आवळल्यात...तर दुसरीकडे जुबैर इलियास हंगरगेकरलाही पुण्यातून अटक करण्यात आलीय.. त्यामुळे आता सुरक्षा यंत्रणांनी देशाविरोधात कुटील डाव रचणाऱ्या सापांना ठेचण्याची गरज आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.