J P Nadda : कार सर्विस सेंटरला नेली अन्...; जेपी नड्डा यांच्या पत्नीच्या कारची चोरी

JP Nadda Wife Car Stolen : कार सर्विस सेंटरमध्ये असतानाच चोरीला गेली. याबाबत महिती मिळताच पोलिसांनी कारचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. चक्क नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
J P Nadda
J P NaddaSaam TV

Delhi News :

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची आलिशान कार चोरीला गेली आहे. महागडी फॉर्च्युनर कार सर्विसिंगला दिलेली असताना तेथूनच ती चोरीला गेली आहे. १९ मार्च रोजी चोरीची ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

J P Nadda
Delhi Crime: दिल्ली पुन्हा हादरली! शिक्षिकेच्या भावानेच केला 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार

कारची सर्विसिंग करायची होती. त्यासाठी कार चालक कार घेऊन दिल्लीतील गोविंदपुरी येथे गेला होता. कार सर्विस सेंटरमध्ये असतानाच चोरीला गेली. याबाबत महिती मिळताच पोलिसांनी कारचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. चक्क नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कार किंवा अन्य वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अनेक ठिकाणी चोरीच्या घटना सर्रास घडतात. अनेक सर्वसामान्य व्यक्तींच्या कार चोरीला गेल्यावर बऱ्याचदा याची दखल देखील घेतली जात नाही. चोरट्यांचा सुळसुळाट इतका वाढला आहे की, त्यांनी आता थेट भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीच्या आलिशान कारवर डल्ला मारला आहे.

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीमुळे जागावाटपावरून सर्वच पक्ष आणि नेते मंडळी चर्चेत आहेत. राज्यातील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची ताकद त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. या सर्व विषयांमध्ये आता जेपी नड्डा यांचं नाव कार चोरीमुळे चर्चेचा विषय बनलं आहे.

वाहन चोरीच्या घटनांमध्ये अडीच पटाने वाढ

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. एका माध्यमसंस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये दर 14 मिनिटांनी एक वाहन चोरी होत आहे.

J P Nadda
Delhi Crime: दिल्ली पुन्हा हादरली! शिक्षिकेच्या भावानेच केला 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com