Delhi Crime: दिल्ली पुन्हा हादरली! शिक्षिकेच्या भावानेच केला 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार

Delhi News: देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा एका क्रूर कृत्याने हादरली आहे. येथे एका चार वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
Delhi Crime News
Delhi Crime NewsSaam Tv
Published On

Delhi Crime News:

देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा एका क्रूर कृत्याने हादरली आहे. येथे एका चार वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. शेजारीच शिकवणीसाठी गेलेल्या या बालिकेवर शिक्षिकेच्या भावाने अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच संतप्त झालेल्या लोकांनी आरोपीच्या घराबाहेर असलेल्या दोन गाड्यांची तोडफोड केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मांडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार वर्षांची मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहते. शेजारी राहणाऱ्या मुलीकडे ती शिकवणीसाठी जाते. मुलीचा भाऊही तिच्यासोबत राहतो. पीडित मुलगी ही शनिवारी शिकवणीसाठी गेली होती, असे सांगितले जात आहे. यावेळी शिकवणी घेणारी मुलगी घरी नव्हती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Delhi Crime News
Karnataka Crime: खजिन्याचा मोह नडला! कारमध्ये सापडले तिघांचे मृतदेह; कर्नाटकमधील थरारक घटना

पीडित मुलगी एकटी असल्याचं पाहून शिक्षिकेच्या भाऊ तिला त्याच्या खोलीत घेऊन गेला. जिथे त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.  (Crime News in Marathi)

मुलगी तेथून निघाल्यानंतर रडत आपल्या घरी आली. यावेळी आईने तिला रडण्याचे कारण विचारले असता, तिने पोटदुखी होत असल्याचं सांगितलं. आईने तिचे कपडे पाहिले तेव्हा तिला संशय आला. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलीला आधी जवळच्या लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात आणि नंतर दिल्लीच्या एम्समध्ये दाखल केले. रुग्णालयात तिच्यावर अत्याचार झाल्याचं डॉक्टरांच्या तपासातून समजलं.

Delhi Crime News
Shocking News: इसिसमध्ये सहभागी होण्याच्या संशयावरून आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्याला अटक; काळा झेंडा आणि ईमेलचा तपास सुरू

दरम्यान, पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात पूर्व दिल्लीचे पोलीस उपायुक्त म्हणाले की, पीडितेची प्रकृती स्थिर आहे. तिला एम्समध्ये पाठवण्यात आले, कारण तेथील वन स्टॉप सेंटरमध्ये लहान मुलांसाठी उत्तम आरोग्य सुविधा आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com