Saam Impact : शिक्षकांना असे आदेश काढले जाऊ नयेत याची काळजी घेतली जाईल : दीपक केसरकर (पाहा व्हिडिओ)

शैक्षणिक कामाव्यतरिक्त शिक्षकांना दिली जातात अन्य काम याविषयावर मंत्री केसरकर बाेलत हाेते.
Deepak Kesarkar
Deepak Kesarkarsaam tv

- विनायक वंजारे

Deepak Kesarkar News : गणेशाेत्सवासाठी तळकोकणात मोठ्या संख्येने चाकरमनी आले आहेत. या चाकरमान्यांचे स्वागत आणि त्यांची उठबस पाहण्यासाठी राजापूरातून आदेश निघाले हाेते. या आदेशानंतर आता शिक्षकांना अशी देखील काम करावी लागणार की काय अशी चर्चा राज्यभरात सुरु झाली. दरम्यान या चर्चेबाबत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना असा प्रकार घडला आहे का याची चाैकशी हाेईल. तसं झालं असल्यास आगामी काळात असे प्रकार घडू नये याची निश्चित काळजी घेतली जाईल असे स्पष्ट केले.

राजापूर तालुक्यातील शिक्षकांना (teachers) गणपतीत (ganpati) येणाऱ्या चाकरमान्यांचे स्वागत करून चहापानाची आणी वाहनांची सोय करण्याचे आदेश राजापूरचे गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी लिखीत पत्र काढून दिले होते. त्यावर आज शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी हा प्रकार याेग्य नसल्याचं म्हटलं. परंतु असं घडलं आहे का याची अगोदर चौकशी व्हावी लागेल असे आणी जर का दोषी आढळले तर आमच्या खात्यामार्फत चौकशी करु असेही स्पष्ट केलं.

Deepak Kesarkar
Ganpati Bappa Morya : पाेलिसांच्या रुपात 'बाप्पा' पावला; नव्वद ताेळे साेनं मिळालं परत

शिक्षकांनी राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होणे हे मी समजू शकतो पण अशा पद्धतीची कामे देणे ही योग्य नाहीत असेही एका प्रश्नावर मंत्री केसरकर यांनी म्हटलं. ते म्हणाले काही शिक्षकांना पंचनामे करण्याचे आदेश दिले गेलेत. त्याबाबत देखील दुरुस्ती केली जाईल. चुकीची प्रथा पडणार नाही म्हणून योग्य ती परिपत्रके काढली जातील.

पुण्यात माझी ७ ते ८ सप्टेंबरला एक महत्त्वपूर्ण बैठक आहे. यावेळेस यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी स्पष्ट केलं.

Edited By : Siddharth Latkar

Deepak Kesarkar
Kokan Ganeshotsav : एक दाेन तीन चार गणपतीचा जय जयकार..., तळकोकणात बाप्पाचं आगमन जल्लाेषात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com