मंत्रिपदासाठी शिवसेनेला एक कोटी दिल्याचा माझ्याकडे पुरावा आहे. मी जास्त पैसे न दिल्याने माझे मंत्रिपद हुकले, असा खळबळजनक आरोप शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. उद्धव ठाकरेंवरील हा सर्वात मोठा आरोप आहे. दीपक केसरकर यांनी थेट पुरावे असल्याचे म्हणत आरोप केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
माझ्यात कर्तृत्व असूनही मला उद्धव ठाकरे यांनी २०१४ मध्ये राज्यमंत्री केलं. पण नंतरच्या काळात सत्ता आल्यानंतर माझ्याकडून कमिटमेंट पूर्ण न झाल्याने मला मंत्री करण्यात आले नाही. याची खुद्द आदित्य ठाकरे यांनीच कबुली दिली आहे. असं देखील दीपक केसरकर यांनी म्हटलं.
चेकद्वारे मी शिवसेनेला (ठाकरे गट) एक कोटी रुपये दिल्याचा माझ्याकडे पुरावा आहे. मंत्रिपदासाठी मी एक कोटी दिले होते. त्यांना यापेक्षाही जास्त पैसे हवे होते. आणखी पैसे न दिल्यानं माझं मंत्रिपद हुकलं, असा गंभीर आरोप दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर केलाय.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सावंतवाडीतील जनसंवाद यात्रेतून मंत्री केसरकर यांच्यावर टीका केली होती. त्याला मंत्री केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलंय.
शिवसेना कोणाची हे गद्दारांनी ठरवण्याची गरज नाही. जनतेला ते माहीत आहे. आता जनता हेच माझं सर्वस्व आहे. आठवड्यातून दोनदा शिर्डीला जाणारे सत्तेच्या उबेसाठी श्रध्दा आणि सबुरी विसरतात. त्यांच्या नसानसात गद्दारी भरलेली आहे. त्यांना जनताच धडा शिकवेल, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी दीपक केसरकर यांच्यावर टीका केली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.