Shyam Manav :मोठी बातमी! 'तुमचाही नरेंद्र दाभोळकर करु...' अंनिसचे श्याम मानव यांना जिवे मारण्याची धमकी

गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर बाबा उर्फ धिरेंद्र महाराज आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक, संघटक आणि प्राध्यापक श्याम मानव यांच्यातील सुरू असलेला वाद चांगलाच चर्चेत आहे.
Shyam Manav Dhirendra Maharaj
Shyam Manav Dhirendra MaharajSaamtv

Shyam Manav: गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर बाबा उर्फ धिरेंद्र महाराज आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक, संघटक आणि प्राध्यापक श्याम मानव यांच्यातील सुरू असलेला वाद चांगलाच चर्चेत आहे. धीरेंद्र कृष्ण महाराज नागपुरात असतानाच अंनिसने त्यांना दिव्य शक्ती सिद्ध करा आणि तीस लाख रुपये मिळवा असे आव्हान दिले होते. 

यानंतर आता श्याम मानव यांच्याबाबत एक मोठी बातमी सध्या समोर येत असून श्याम मानव यांना धमकीचे फोन आल्याची बातमी समोर आली आहे. (Latest Marathi Update)

Shyam Manav Dhirendra Maharaj
Devendra Fadanvis: बाळासाहेबांना अभिवादन करताना फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका, म्हणाले; 'बाळासाहेबांशी नातं..'

मिळालेल्या माहितीनुसार, श्याम मानव यांच्या मुलाच्या मोबाईलवर धमकीचे एसएमएस आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये श्याम मानव यांचा नरेंद्र दाभोळकर करु अशी धमकी देण्यात आली आहे.

धीरेंद्र महाराजांच्या भक्तांकडून ही धमकी देण्यात आल्याचा आरोप अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महासचिव हरिष देशमुख यांंनी केला आहे. याबाबत श्याम मानव यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. (Police)

Shyam Manav Dhirendra Maharaj
Pune-Bangalore National Highway : खंबाटकी घाटात दाेन ट्रकचा अपघात; जाणून घ्या वाहतुकीची स्थिती

काय आहे धीरेंद्र महाराज आणि श्याम मानव यांचा वादः

काही दिवसांपूर्वी नागपुरात धीरेंद्र कृष्ण महाराज यांची राम कथा आणि दिव्य दरबार झाले होते. या दिव्य दरबारच्या माध्यमातून धीरेंद्र कृष्ण महाराज अंधश्रद्धा पसरवतात असा अंनिसने आरोप केला होता. धीरेंद्र कृष्ण महाराज नागपुरात असतानाच अंनिसने त्यांना दिव्य शक्ती सिद्ध करा आणि तीस लाख रुपये मिळवा असे आव्हान दिले होते. ज्यानंतर त्यांच्यामध्ये हा वाद सुरू झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com