Gautami Patil: नृत्यांगणा मृणाल कुलकर्णींनी गौतमी पाटीलला सुणावले खडेबोल, म्हणाल्या; 'प्रसिद्धीसाठी घाणेरडी....'

गौतमी काही माझी वैरी नाही मात्र झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी करत असलेले चाळे तिने बंद करावेत, अशा शब्दात गौतमीला खडेबोल सुणावले आहेत.
Gautami Patil
Gautami PatilSaam Tv

विश्वभूषण लिमये, सोलापूर

Solapur: लावणी कलावंत गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. आपल्या जबरदस्त अदा आणि तडफदार डान्समुळे गौतमीची तरुणांमध्ये विशेष क्रेझ आहे. तिच्या कार्यक्रमाला नेहमीच तुफान गर्दी पाहायला मिळत असते.

मात्र गौतमी पाटील अश्लिल नृत्य करत असल्याचीही टीका नेहमीच होत असते. नृत्यांगणा मृणाल कुलकर्णीनेही गौतमी पाटीलवर जोरदार टीका करतान गौतमीने अश्लिल नृत्य करणे बंद केले पाहिजे असा सल्ला दिला आहे. (Latest Marathi News)

Gautami Patil
Viral Video: आईचं प्रेम! अनोळखी माणसाने दिलेलं खायचं नाही, माकडाने दिले बाळाला धडे; जबरदस्त Video व्हायरल...

याबाबत अधिक माहिती अशी की, गौतमी पाटीलच्या अश्लिल चाळ्यांमुळे तिच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. गौतमीने लावणी करताना अश्लिल चाळे आणि हातवारे करणे बंद केले पाहिजे अशा शब्दात नृत्यांगणा मृणाल कुलकर्णी यांनी गौतमीवर निशाणा साधला आहे.

याबद्दल बोलताना मृणाल कुलकर्णी म्हणाल्या की, "लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती जपण्याचं काम आम्ही करतोय. गौतमी तिच्या डान्ससाठी माफी मागते आणि पुन्हा त्याच चुका करते तिच्यामुळे लावणी बंद करण्याची मागणी होत असून ज्यांची पोट लावणीवर भरतात त्यांचे नुकसान होऊ नये."

Gautami Patil
Crime News : पत्नीला दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको त्या अवस्थेत बघितलं; पतीचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

त्याचबरोबर, "गौतमी काही माझी वैरी नाही मात्र झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी करत असलेले चाळे तिने बंद करावेत," अशा शब्दात लावणी कलावंत मृणाल कुलकर्णी यांनी गौतमी पाटीलला खडेबोल सुणावले आहेत. सोलापूरमध्ये लावण्यखणी कार्यक्रमासाठी आल्या असताना त्यांनी गौतमीवर निशाणा साधला आहे. (Solapur)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com