Viral Video: आईचं प्रेम! अनोळखी माणसाने दिलेलं खायचं नाही, माकडाने दिले बाळाला धडे; जबरदस्त Video व्हायरल...

अनोळखी माणसाने दिलेलं खायचं नाही, हाच धडा आपल्या पिल्लाला देणाऱ्या माकडिणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Viral Video
Viral VideoSaamtv

Viral Video: सोशल मीडियावर माकडांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. कधी झाडावर लटकताना, कधी उड्या मारताना तर कधी वाकुल्या दाखवतानाचे अनेक व्हिडिओ आत्तापर्यंत पाहिले असतील. पण सध्या सोशल मीडियावर एका माकडिणीचा आणि तिच्या पिल्लाचा गोड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये ती माकडिण आपल्या पिल्लाला अनोखळी व्यक्तींकडून खायला घेवू नकोस, असेच बजावताना दिसत आहे. (Viral Video)

Viral Video
Viral Video: पठानचीच हवा! तो सीन सुरू झाला अन्...; शेकडो प्रेक्षक पळाले...; व्हिडिओ व्हायरल

अनोळखी व्यक्तीने दिलेलं कधी खायचं नाही, अशी सुचना आपल्या आई वडिलांकडून अनेकदा ऐकतो. प्रवासात किंवा बाहेर पडताना आपल्याला याबद्दल आई वडिल अनेकदा बजावताना दिसतात. हाच धडा आपल्या पिल्लाला देणाऱ्या माकडिणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

काय आहे हा व्हिडिओ?

या व्हिडिओत एक व्यक्ती आपल्या हातातील खाऊ समोर बसलेल्या माकडाच्या पिल्लाला देतो. तो हातातील खाऊ तो पिल्लाच्या समोर पकडतो. ते लहान पिल्लूही खाऊ घेण्यासाठी धावते. मात्र त्या पिल्लाची आई त्याला जोरात मागे खेचते. ते पिल्लू पुन्हा पुन्हा खाऊ घ्यायला धावते मात्र ती माकडिण काही त्याला तो खाऊ खायला सोडत नाही.

Viral Video
Viral News: धक्कादायक! पाळीव कुत्र्याने बंदुकीतून गोळी झाडल्याने मालकाचा मृत्यू

इतकेच नव्हेतर त्या पिल्लाला खायला देणाऱ्या व्यक्तीवरही ती माकडिण जोरात ओरडताना दिसत आहे. हा गोड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हा व्हिडिओ २२ जानेवारीला शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओसोबत माकड आपल्या बाळाला अनोखळी व्यक्तीने दिलेले खायचं नाही असं शिकवत आहे असा कॅप्शनही दिला असून आत्तापर्यंत हा व्हिडिओ तब्बल १.४ मिलियन लोकांनी पाहिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com