Cyrus Mistry Death : सायरस मिस्त्रींचा कार अपघात नेमका कसा घडला ? महत्वाची माहिती समोर

सायरस मिस्त्री यांचा अपघात नेमका कसा घडला ? याबाबत पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी महिती दिली आहे.
Cyrus Mistry Death News
Cyrus Mistry Death News saam tv

Cyrus Mistry Death: पालघरच्या चारोटी येथील ब्रिजवर टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कारला अपघात (Accident) झाला. या अपघातात मिस्त्री यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर कॉर्पोरेट जगतात शोककळा पसरली आहे. सायरस मिस्त्री यांचा अपघात नेमका कसा घडला ? याबाबत पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी महिती दिली आहे.

Cyrus Mistry Death News
Cyrus Mistry Accident| रतन टाटा आणि सायरस मिस्त्री हे एकमेकांचे नातेवाईक सुद्धा होते

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी येथील सूर्या नदीच्या पुलावर साधारणतः दुपारी ३:१५ वाजेच्या सुमारास गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या त्यांचा गाडीचा दुभाजकाला आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्यासह जहांगीर पंडोल नामक सहकारी अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सदर अपघाताबाबत पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील म्हणाले, 'मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरमधील चारोटी येथे झालेल्या भीषण अपघातात टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्यासह जहांगीर पंडोल या त्यांच्या सहकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर महिला चालक अनयता पंडोल आणि दरीयस पंडोल हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना वापी येथील रेम्बो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे. सायरस मिस्त्री हे अहमदाबाद वरून मुंबईला जात असताना हा अपघात झाला. महामार्गावर पालघर मध्ये अनेक ब्लॅक स्पॉट आहेत. तसेच या अपघाताचा तपास सुरू करण्यात आला आहे'.

Cyrus Mistry Death News
सायरस मिस्त्री यांचं अकाली निधन होणं धक्कादायक, PM मोदींनी वाहिली श्रद्धांजली

दरम्यान, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी जवळील सूर्या नदीच्या पुलावरील दुभाजकाला कार धडकल्याने हा अपघात झाला. महामार्गावर असलेल्या तीन लेन अचानक दोन लेन होत असल्याने चालकाला त्याचा अंदाज न आल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महामार्गावर अनेक ब्लॅक स्पॉट असताना देखील 'एनएचएआय' याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com