सायरस मिस्त्री यांचं अकाली निधन होणं धक्कादायक, PM मोदींनी वाहिली श्रद्धांजली

सायरस मिस्त्री यांच्या अकाली निधनामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींना धक्का बसला आहे.
PM Narendra Modi condolences to Cyrus Mistry
PM Narendra Modi condolences to Cyrus MistrySaam Tv

नवी दिल्ली : पालघरच्या चारोटी येथील ब्रिजवर टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात मिस्त्री यांचा दुर्देवी मृ्त्यू झाल्याची माहिती पालघरच्या जिल्हा अधिक्षकांनी दिली आहे. सायरस यांच्या अकाली निधनामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींना धक्का बसला आहे. मोदी यांनी ट्विट करत सायरस यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. (Cyrus Mistry died in car accident)

नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, सायरस मिस्त्री यांचा अकाली निधन होणं हे धक्कादायक आहे. त्यांच्या मृत्यूमुळं जागतिक अर्थव्यवस्थेचं आणि उद्योग समुहाचं मोठं नुकसान झालं आहे. सायरस मिस्त्री हे ध्येयवादी उद्योगपती होते. त्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास होता. सायरस यांच्या कुटुंबीय आणि मित्र परिवाराप्रती शोक व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो.

PM Narendra Modi condolences to Cyrus Mistry
Cyrus Mistry Accident| रतन टाटा आणि सायरस मिस्त्री हे एकमेकांचे नातेवाईक सुद्धा होते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com