सध्याचे राजकारण म्हणजे एखाद्याला जीवनातून उठवणे; धनंजय मुंडेंचा टोला

अधिवेशन आले, की त्यावेळी सत्ताधारी हे विरोधकांना कशा पद्धतीने दाबायचा प्रयत्न करायचे, हे मी मागचे पाच वर्ष विरोधी पक्षात होतो, तेव्हा अनुभवलेलं आहे.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSaam Tv News
Published On: 

बीड: एखाद्या माणसाला राजकारणातूनचं नाही तर जीवनातून कसे उठवले जाईल, असे सध्याचे राजकारण सुरू आहे असं म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांना सणसणीत टोला लगावला आहे. ते परळीतील वैद्यनाथाचे दर्शन घेतल्यानंतर मीडियाशी बोलत होते. यावेळी मीडियाशी बोलतांना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, की अधिवेधनाच्या आधीची परिस्थिती आणि अधिवेशनाच्या नंतरची परिस्थिती, हे आपल्याला कदाचित मागच्या अनेक अधिवेशनपासूनचा अनुभव आपल्याला घ्यायला पाहिजे होता.

अधिवेशन आले, की त्यावेळी सत्ताधारी हे विरोधकांना कशा पद्धतीने दाबायचा प्रयत्न करायचे, हे मी मागचे पाच वर्ष विरोधी पक्षात होतो, तेव्हा अनुभवलेलं आहे. मागच्या अडीज वर्षात सत्ता बदललीय, सत्तेतले विरोधी पक्षात गेले आणि विरोधी पक्षातले सत्तेत आलेत. ते अतिशय वेगळ्या प्रकारचे राजकारण करत आहेत. एखादा माणूस राजकारणातूनचं नाही तर जीवनातून कशा पद्धतींने उठवले जाईल. असं राजकारण सध्या सुरू आहे. असं म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर सणसणीत निशाणा साधला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.