सांगलीत गव्याच्या दहशतीमुळे जमावबंदी तर कोट्यावधींची उलाढाल ठप्प

गव्याला पकडण्यासाठी पुण्याची रेस्क्यू टीम दाखल झाली आहे. मात्र या गव्यामुळे नागरिकाच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेली 3 दिवस सांगलीच्या सीमेवर घुटमळणारा गवा मध्यरात्री सांगली शहरात दाखल झाला आहे.
सांगलीत गव्याच्या दहशतीमुळे जमावबंदी तर कोट्यावधींची उलाढाल ठप्प
सांगलीत गव्याच्या दहशतीमुळे जमावबंदी तर कोट्यावधींची उलाढाल ठप्पSaamTV
Published On

सांगली : राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉन (Corona and Omicron) या रोगाने अनेक जिल्ह्यात जमावबंदीचे विचार सुरू आहेत. पण सांगली शहरात ओमिक्रॉन नव्हे तर गव्या रेड्यामुळे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. गव्याला पकडण्यासाठी पुण्याची रेस्क्यू टीम दाखल झाली आहे. मात्र या गव्यामुळे नागरिकाच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेली तीन दिवस सांगलीच्या सीमेवर घुटमळणारा गवा मध्यरात्री सांगली शहरात दाखल झाला आहे. सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून गवा रेड्याने मार्गक्रम करीत सकाळच्या सुमारास मार्केट यार्ड गाठले. शहरात मध्यरात्री असणाऱ्या निरव शांततेमुळे गवा न भुजता दिसेल त्या मार्गाने पुढे जात होता. दोन दिवसांपूर्वी सांगली वाडीत दिसलेला गवा आज मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे सांगली (Sangli) शहरात दाखल झाला आहे. (curfew in Sangli due to gaur terror)

सांगलीत गव्याच्या दहशतीमुळे जमावबंदी तर कोट्यावधींची उलाढाल ठप्प
कालीचरण महाराजांच्या अडचणीमध्ये वाढ; अकोला काँग्रेसकडून तक्रार दाखल

टिळक चौकमार्गे गवा शहरात आला असून वखारभाग, कॉलेजकॉर्नर मार्गे तो सध्या सांगलीच्या मार्केट यार्डात दाखल झाला आहे. तर त्याला त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी पाठवण्यासाठी तहसीलदार, वन विभाग, स्थानिक पोलीस, आणि पुण्याची रेस्क्यू टीम प्राणीमित्र प्रयत्न करत आहेत. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट मध्ये गवा रेडा घुसला आहे. त्यामुळे परिसर बंद करण्यात आला आहे. गव्याला पाहण्यासाठी मार्केट यार्ड समोर बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे परिसर बंद करण्यात आला आहे. मार्केट मध्ये आज गुळाचे सौदे (Jaggery Deals) होते त्यासाठी कर्नाटक आणि आसपासच्या परिसरातून आलेले गुळाचे ट्रक बाहेर थांबून आहेत. मार्केट यार्ड बाहेर रांगच रांग लागली आहे. तर मार्केट मधील 10 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.

हे देखील पहा -

सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Sangli Agricultural Produce Market Committee) मार्केट मध्ये गवा रेडा आल्याने परिसर बंद करण्यात आला आहे. जमावबंदी आदेश लागू केला आहे. मार्केटचे सर्व गेट बंद करण्यात आले आहेत. जो पर्यंत गवा रेडा पकडला जात नाही तोपर्यंत ही जमावबंदी (Curfew) असणार असल्याचे तहसीलदार डी एस कुंभार (D.S Kumbhar) यांनी सांगितले आहे. घटनास्थळी तहसीलदार, वन अधिकारी, पोलीस, रेस्क्यू टीम आणि प्राणी मित्र आहेत. गव्याला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com