राजेश भोस्तेकर, रायगड
रायगड: कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याने पर्यटकांची पावले ही अलिबाग समुद्रावर वळली आहेत. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. समुद्रावर पर्यटकांची धूम मौजमस्ती सुरू आहे. अलिबाग, नागाव, वरसोली, आक्षी समुद्रकिनारे हे पर्यटकांनी बहरले आहेत. आज रविवारी सर्वच किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी झाली होती. (Crowds of tourists on the beach of Alibaug)
हे देखील पहा -
गणपतीनंतर कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे अलिबागमध्ये पर्यटक हे येत असले तरी हवी तशी गर्दी समुद्र किनाऱ्यावर होत नव्हती. मात्र आज रविवारी अलिबागेत पर्यटकांची जत्रा भरल्याचे चित्र समुद्रावर दिसत होते. समुद्र स्नानाचा आनंद बच्चे कंपनीसह मोठेही घेत होते. उंट, घोडा, तसेच एटीव्ही बाईकचा आनंद लुटताना पर्यटकांची धूम मस्ती सुरू होती. पर्यटक पुन्हा अलिबागेत येऊ लागल्याने स्थानिक व्यवसायिकही आनंदित आहेत. पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागल्याने हॉटेल, लॉज, रिसॉर्ट व्यवसायिक याना आर्थिक फायदा होऊ लागला आहे.
राज्यात आता कोरोना निर्बंध बऱ्यापैकी शिथिल करण्यात आले आहे. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात असल्याने राज्यात ४ ऑक्टोबरपासून शाळा तर ७ ऑक्टोबरपासून मंदिरं खुली होणार आहेत. याशिवाय २२ ऑक्टोबरपासून थिएटर्सही खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे मनोरंजनासह पर्यटन क्षेत्रालाही त्याचा फायदा होणार आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.