Buldhana News: रविकांत तुपकारांच्या आंदोलनाचा धसका; विमा कंपनीचं शेतकऱ्यांना ७० कोटी रुपये देण्याचं आश्वासन, काय आहे प्रकरण?

एआयसी पिकविमा कंपनीने बुलढाणा जिल्ह्यातील ५७ हजार ७५७ शेतकऱ्यांना ७० कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे.
Ravikant Tupkar, Buldhana
Ravikant Tupkar, BuldhanaSaam Tv
Published On

Buldhana News: शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनाचा इशारा देताच निगरगठ्ठ झालेली एआयसी पिकविमा कंपनी वठणीवर आली आहे. एआयसी पिकविमा कंपनीने बुलढाणा जिल्ह्यातील ५७ हजार ७५७ शेतकऱ्यांना ७० कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे.

१५ जून २०२३ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचे लेखी आश्वासनाचे पत्र रविकांत तुपकर यांना दिले आहे. हे रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचे मोठे यश आहे. मात्र आपला सदर कंपनीवर विश्वास नाही, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत आपण आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

नुकसान भरपाई तातडीने द्या

सोयाबीन - कापसाला दरवाढ द्यावी, पिकविमा, अतिवृष्टीचे व सततच्या पावसाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, पिककर्जाचे वाटप पेरणीपूर्वी करावे, सी-बीलची अट लावणाऱ्यां व अनुदाला होल्ड लावणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करावी, पेरणी शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपयांची मदत द्यावी, वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई तातडीने द्यावी यासह शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रमुख मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन करीत आहे.

Ravikant Tupkar, Buldhana
Maharashtra Politics: 'बाळासाहेबांची शिवसेना म्हणतात, पण...'; जाहिरातीवरून छगन भुजबळांचा CM एकनाथ शिंदे यांना टोला

प्रशासन अलर्ट

परंतु सरकार दुट्टपी धोरण राबवित आहे. त्यामुळे १५ जून पर्यंत मागण्या पूर्ण न केल्यास १६ जून रोजी हजारो शेतकऱ्यांना घेऊन मुंबईत धडक देऊ आणि एआयसी या विमाकंपनीच्या मुंबईतील बॉम्बे स्टॉक मार्केट मधील २० व्या मजल्यावर असलेल्या कार्यालयातून उड्या मारु, असा गंभीर इशारा रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी ९ जून रोजी दिला. त्यानंतर अगदी बुलढाण्यापासून मुंबई पर्यंतचे प्रशासन अर्लट झाले.

बुलढाणा पोलिसांनी तुपकरांना नोटीस बजावून आंदोलन न करण्याच्या सूचना दिल्या, गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला मात्र तरीही आंदोलन करणारच या भूमिकेवर तुपकर कायम होते. दरम्यान या आंदोलनाच्या धसक्याने एआयसी पिकविमा कंपनी वठणीवर आली आहे.

पावसाची नुकसान भरपाई

बुलढाणा जिल्ह्यातील ५७ हजार ७५७ शेतकऱ्यांना ७० कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केली असून १५ जून २०२३ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचे लेखी आश्वासनाचे पत्र रविकांत तुपकर यांना १२ जून रोजी दिले आहे. परंतु जोपर्यंत हे संपूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाही.

Ravikant Tupkar, Buldhana
Cabinet Decision : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 1500 कोटींच्या निधीला मंजुरी; ग्रामसेवक आणि विद्यार्थ्यांसाठीही खूशखबर

तसेच उशिरा तक्रार केल्याच्या नावाखाली अपात्र केलेल्या ११ हजार शेतकऱ्यांच्या व इतर १५ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत कंपनी काही निर्णय घेत नाही. अतिवृष्टीची व सततच्या पावसाची नुकसान भरपाई आणि इतर मागण्या मान्य होत नाहीत, तोवर आम्ही माघार घेणार नाही, आंदोलनाच्या भूमिकेकर आम्ही ठाम आहोत, असे रविकांत तुपकर यांनी सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com