Costa Rica Zoo: एखादा जीव जन्माला येण्यासाठी नर आणि मादी यांचे मीलन महत्वाचे असते. त्याशिवाय प्रजोत्पादन होत नाही. मात्र कोस्टा रिका या देशात चकित करणारी एक घटना घडली आहे. या घटनेत एक मगर नराशिवाय गर्भवती राहिली. तसेच तिने आपल्या बाळाला जन्मही दिला आहे. हे बाळ ९९ टक्के अगदी आईसारखे दिसतेय. मात्र जन्म होण्याआधीच मगरीच्या पील्लाचा मृत्यू झाला आहे.(Latest Marathi News)
'बायोलॉजी लेटर्स' या नियतकालिकात या बाबतची माहिती छापून आली आहे. अमेरिकेतील व्हर्जिनिया पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आणि स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या मतानुसार, मगरीने पिल्लाला जन्म दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून संशोधक प्राण्यांच्या प्रजननाच्या वेगळ्या पद्धती शोधत आहेत. अशात मगरीसोबत अशी घटना पहिल्यांदाच घडल्याने सर्वत्र याची चर्चा सुरु आहे. मगरिने नराशिवाय पिल्लाला जन्म देण्याची ही फारच दुर्मीळ घटना आहे.
साल २०१६ पासून ही मगर बंदिस्त ठेवण्यात आली होती. साल २०१८ मध्ये तिचे निरिक्षण करण्यात आले. मगर बाकिच्या इतर मगरिंपासून वेगळी ठेवली होती. तरी देखील आश्चर्याची बाब म्हणजे मगरीने तब्बल १४ अंडी घातली. यातील एका अंड्यात गर्भ देखील वाढला. मात्र अंड जेव्हा फुटलं तेव्हा त्यातून मृत मगर बाहेर पडली. मगरींमधील या दुर्मीळ पुनरुत्पादनाने वैज्ञानिकांची उत्सुकता वाढली आहे.
अंडी ज्या तापमानात उबविली जातात, त्यावर जन्मणाऱ्या पिलाचे लिंग निश्चित होते. एखाद्या प्राण्यामध्ये पूर्वजांकडून हा गुण वारसारुपाने आलेला असतो. त्यामुळेच डायनोसॉरही स्वतःच पुनरुत्पादन करण्यास सक्षम असावेत, असं संशोधक म्हणत आहेत. अमेरिकन मगरीने अशा प्रकारे एकट्यानेच जीव जन्माला घालणे हे मगरीच्या नामशेष झालेल्या अर्कोसॉरियन पूर्वजांमध्ये विशेषतः टेरोसॉरिया आणि डायनासोरिया प्रजातींमध्ये अशा प्रकारची क्षमता होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.