सांगली : सांगलीच्या ( Sangli ) पलूस तालुक्यातील चोपडेवाडी येथील कृष्णा नदीच्या पाणवठ्यावर पाणी प्यायला गेलेल्या घोड्यावरती ( horse ) मगरीने (Crocodile) झडप मारून हल्ला करून पाण्यात ओढून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घडली. या घटनेने आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली आहे. (Sangli Latest News In Marathi)
हे देखील पाहा -
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडेवाडी येथील मुलगा आर्यन हे घोड्याला घेऊन चारण्यासाठी कृष्णा नदीच्या पाणवट्यावर घेऊन गेला होता. त्यावेळी घोडा चरत-चरत नदीच्या काठावरती पाणी प्यायला गेला.याचवेळी पाण्यामध्ये असलेल्या मगरीने घोड्यावरती झडप मारून काही कळायच्या आत पाण्यात ओढून घेतले.यावेळी हातात घोड्याची दोरी घेऊन उभे असलेले उदय मोरे यांनी घोड्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु मगरीच्या ताकतीपुढे त्यांचे काही चालले नाही. यावेळी आजूबाजूला असणाऱ्या मच्छिमार करणाऱ्या लोकांनी आरडा-ओरडा करून घोड्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी ७ वाजेपर्यंत येथील नागरिकांनी घोड्याचा शोध घेतला.परंतु घोडा सापडला नाही.
दरम्यान,या भागात असणाऱ्या मगरीने याअगोदर सुद्धा प्राणी आणि महिलांच्या वरती हल्ला केला आहे.दोन महिन्यापूर्वी येथे चरायला आलेल्या मेंढयांवरती हल्ला करून दोन मेंढयाना ओढून नेले होते. तर आठ महिन्यापूर्वी येथे कपडे धुत असलेल्या महिलेवरती सुद्धा हल्ला करून हाताला मोठी इजा केली होती. दैव बलवत्तर म्हणून त्या महिलेचा जीव मगरीपासून वाचला होता. आतातरी या भागात वनविभागाने लक्ष देऊन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्यात,अशी येथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
Edited By - Vishal Gangurde
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.