Nashik Crime News: नाशिक हादरलं; विवाहित महिलेची सामूहिक अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या

Nashik Crime News: पोलिसांकडून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
Nashik Crime News
Nashik Crime NewsSaam TV

नाशिक: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. महाराष्ट्राला हादरवणारी ही घटना इगतपुरी तालुक्यातील खंबाळेमध्ये घडली आहे.

पोलिसांकडून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे गावकरी संतप्त झाले असून घोटी पोलीस ठाण्याबाहेर गावकऱ्यांचा मोठा जमाव झाला आहे. (Nashik News)

Nashik Crime News
Kalyan News : पाणी द्या नाहीतर विषप्राशन करण्यासाठी परवानगी द्या'; तीव्र पाणीटंचाईमुळे महिला आक्रमक

मात्र घटनास्थळी पोलीस उशीरा पोहोचल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. महिलेचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका संतप्त गावकऱ्यांनी घेतली आहे. यामुळे घोटी पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे. (Crime News)

Nashik Crime News
IMD Rain Alert: विदर्भात पुढचे तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घोटी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहे. गावकऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com