Beed News: धक्कादायक! गांजा, सिगारेट, दारू पिण्यासाठी 'तो' चोरायचा मोबाईल; अट्टल आरोपीला अटक

पोलिसांनी अवघ्या 24 तासांत याचा छडा लावून चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत...
Beed Crime
Beed CrimeSaamtv

Crime News: गांजा, सिगारेट, दारू प्यायला पैसे नव्हते म्हणून मोबाईल चोरणाऱ्याला बीड पोलिसांनी अटक केली आहे. शेख फिरोज शेख सादेख असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. लहान मुलांना धमकावून मोबाईल हिसकावून घेण्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. आरोपीला अटक केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Latest Marathi Update)

Beed Crime
Viral Video: ग्रेट सरप्राईज! जेव्हा शेतात राबणाऱ्या आईला DSP मुलगा भेटायला येतो, संवाद ऐकून नेटकरीही म्हणाले; 'लेक असावा तर असा...'

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, ज्ञानदीप बालासाहेब तोंडे (वय 15) हा अल्पवयीन मुलगा आपल्या मित्रांसोबत बीड शहरातील खासबाग परिसरात खेळत होता. याचवेळी फिरोज त्याठिकाणी आला. यावेळी आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधून तो ज्ञानदीप जवळ जावून मी पोलीस असून तुझा मोबाईल माझ्याकडे दे, अशी मागणी त्या मुलाला केली. तसेच उद्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून घेऊन जा, असे सांगून मोबाईल हिसकावला.

Beed Crime
Sanjay Raut News: संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? विधानसभा अध्यक्षांकडून आजच हक्कभंग समिती नेमली जाण्याची शक्यता

परंतू ज्ञानदीपने त्याचा पाठलाग केला. यावेळी आरोपी फिरोज शेख सादेखने त्याला मारहाण केली. तसेच मागे येत असल्याने त्याला दगड फेकून मारले व पळून गेला. मात्र त्यानंतर बीड शहर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत याचा छडा लावून गांजा ओढत असताना चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. (Beed News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com