-- कैलास चौधरी
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तिकुळी येथे 14 व्या वित्त आयोगातून सुमारे पंचवीस ते तीस लाख रुपयांची कामे झाली असल्याचे दाखवण्यात आले आहे. परंतु, वास्तवात अशी कामे झालेलीच नाहीत. ही कामे झाली असल्याचे सांगत ग्रामसेवकांनी या मध्ये निधी उचलून खर्च केला असल्याचा आरोप करत त्रिकोळी येथील तरुणांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
हे देखील पहा :
यामध्ये दलित वस्तीमध्ये समाज मंदिरा समोर सभामंडप बांधणी, शेतकरी अभ्यास सहलीचे नियोजन करणे, अंगणवाडी दुरुस्ती करणे, सोलार पथदिव्यांच्या ऐवजी साधे पथदिवे बसविणे, शासनाकडून मंजूर केलेली कामे सर्व बदलून वेगळीच कामे करणे, तळ्यातील विहिरीचे काम अपूर्ण ठेवणे, फवारणी यंत्र खरेदी करणे, शुद्ध पेयजल करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन आदी कामांमध्ये अपहार झालेला आहे.
असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. तसेच या संबंधी ग्रामसेवकांनी देखील लेखी दिल्याचे सांगितले तसेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित ग्राम सेविकांना दहा हजार रुपये कोणतीही पावती न घेता त्या खर्च केल्याच्या कारणावरून कारवाई करण्याची नोटीसही बजावली आहे. परंतु, अद्याप यामध्ये काहीही कारवाई झाली नसल्यामुळे उपोषण करण्यात येत आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.