Coronavirus In Maharashtra: कोरोनाच्या ताज्या आकडेवारीने वाढवलं टेन्शन! वेगाने होतोय प्रसार; राज्यात आज तिघांचा मृत्यू

Coronavirus In Maharashtra: आता काळजी घ्यावीच लागेल, वेगाने वाढतेय कोरोनाची रुग्णसंख्या; राज्यात आज तिघांचा मृत्यू
Coronavirus In Maharashtra
Coronavirus In Maharashtrasaam tv
Published On

>> रुपाली बडवे

Coronavirus News: राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतोय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. गुरुवारी देखील राज्यात ८०३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर आज दिवसभरात ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मुंबई, ठाणे आणि जालन्यात रुग्णांचा समावेश आहे.

राज्यात आज दिवसभरात ६८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील आजपर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७९९५२३२ वर पोहोचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१४ टक्के झाले आहे. आज एका रुग्णांचा मृत्यू झाला. यानंतर राज्यातील मृत्यूदर १.८२ एवढा आहे.

Coronavirus In Maharashtra
Jitendra Awhad News: जितेंद्र आव्हाडांनी कौतुक केलेल्या रॅपरला अटक, ट्विट करत व्यक्त केला संताप; काय आहे प्रकरण?

मुंबईतही कोरोनाचा वेगाने प्रसार

मुंबईत देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत आज दिवसभरात २१६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर एका ३६ वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचे निधन झाले आहे.

मार्चपासून वाढतोय प्रादुर्भाव

मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून देखील खबरदारी घेतली जात आहे. सर्व नागरिकांनी कोविड योग्य वर्तणूक करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Coronavirus In Maharashtra
Hanuman Idol Crying : देवाचा कोप की आणखी काही?; हनुमानाच्या डोळ्यांतून अश्रू येत असल्याचा Video व्हायरल

ही काळजी घ्या....

- गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे.

- शिंकताना किंवा खोकताना नाक किंवा तोंड झाकण्यासाठी रुमाल किंवा टिश्यू पेपर वापरणे.

- हात सतत स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे.

- आजारी असल्यास घरात विलगीकरणात राहणे.

- श्वसनाचे आजार असल्यास वैयक्तिक संपर्क मर्यादित करणे.

- ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असल्यास त्वरीत डॉक्टरांना भेटणे. (Coronavirus)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com