कोल्हापूर - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवरुन कोल्हापुरात (Kolhapur) वाद सुरू झाला आहे. मुश्रीफ यांच्या नावामध्ये प्रभू रामाचं नाव चित्रित केल्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता भाजपचे नेते समरजीत घाटगे यांनी आक्षेप नोंदवला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरोधात समरजीत घाटगे तक्रार दाखल करणार आहेत. (Hasan Mushrif Latest News Updates)
राम नवमीच्या दिवशी हसन मुश्रीफ यांच्या नावाच्या केलेल्या पोस्टरवरुन घाटगे यांनी आक्षेप घेतला आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडून श्रद्धाळू बहुजन समाजाच्या भावना दुखावणारे हे कृत्य आहे, असा आरोप देखील घाटगे यांनी केला आहे.
हे देखील पहा -
हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाला लावलेल्या पोस्टरवरुन नवा निर्माण झाला आहे. राम नवमीदिवशी हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मात्र, वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या निमित्ताने कोल्हापूर दूध उत्पादक संघाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पोस्टरवर हसन मुश्रीफ यांचे नाव श्रीरामांसोबत जोडण्यात आले होते. यावरुन आता कोल्हापुरात राजकारण तापणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान यावर आता हसन मुश्रीफ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आपल्याला माहिती नसेल, पण मी 50-55 वर्षांपासून रामनवमीला वाढदिवस साजरा करतो. या दिवशी हजारो कार्यकर्ते मला शुभेच्छा देतात. जाहिरात देतात. मी त्यादिवशी इथं नसतो. मी जाहिरात बघितली नव्हती, असे देखील ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, काल 3 वर्षे गायब असलेले झाड अचानक समोर आलं. त्यांना कुणीतरी उकसवले आहे आणि आपण आता आलोय हे दाखवावं म्हणून ते आलेत. हे धाडस त्यांना महाग पडेल, अशी टीका समरजीत घाटगे यांच्यावर केली आहे.
माझी आई मला म्हणायची राम नवमी दिवशी जन्मलो आहे. गोकुळ दूध संघाने ती जाहिरात दिली आहे. त्यात माझा काय संबंध, त्यात चुकीचं काय? असा सवाल देखील मुश्रीफ यांनी यावेळी उपस्थित केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.