शिवसेना आमदारांच वादग्रस्त वक्तव्यं; राज्यभरातील ग्रामसेवकांनी पुकारलं काम बंद आंदोलन !

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी ग्रामसेवकांच्या बाबतीत बोलताना अपशब्द काढल्याने त्याच्या विरोधात ग्रामसेवक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
शिवसेना आमदारांच वादग्रस्त वक्तव्यं; राज्यभरातील ग्रामसेवकांनी पुकारलं काम बंद आंदोलन !
शिवसेना आमदारांच वादग्रस्त वक्तव्यं; राज्यभरातील ग्रामसेवकांनी पुकारलं काम बंद आंदोलन !SaamTV
Published On

औरंगाबाद : औरंगाबाद Aurangabad शहरात झालेल्या महिला सरपंच परिषदेत बोलताना शिवसेना आमदार संजय शिरसाट (Shiv Sena MLA Sanjay Shirsat) यांनी ग्रामसेवकांच्या Gramsevak बाबतीत बोलताना अपशब्द काढल्याने त्याच्या विरोधात ग्रामसेवक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

हे देखील पहा -

राज्यभरातील ग्रामसेवकांमध्ये संतापाची लाट पसरली असून. शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज राज्यातील ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन जाहीर केलं आहे. तसंच संजय शिरसाटांनी सर्व ग्रामसेवक वर्गाची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिवाय लोकांमध्ये ग्रामसेवकांबद्दल गैरसमज निर्माण करणाऱ्या वक्तव्य केल्याबाबत त्याच्यावरती फौजदारी गुन्हा Criminal offense दाखल करावा, अशी मागणी देखील ग्रामसेवकांच्या वतीने करण्यात आली आहे.

शिवसेना आमदारांच वादग्रस्त वक्तव्यं; राज्यभरातील ग्रामसेवकांनी पुकारलं काम बंद आंदोलन !
बायकोने पोलिस नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्येच रंगेहाथ पकडलं अन् सुरु झाली हाणामारी

आमदार शिरसाट यांनी औरंगाबाद येथे सोमवारी महिला सरपंच परिषदैत बोलताना ते म्हणाले होते. ‘एक लक्षात ठेवा, सगळ्यात भामटा माणूस असेल तर तो ग्रामसेवक. तुम्हाला तो कधी मूर्ख बनवेल सांगता येत नाही. तो तुमचे ऐकतो असे दाखवतो, मात्र बाहेर गेल्यास सरपंचांच्या सांगण्यावरून केले असे सांगत स्वतःच्या अंगावर काही येऊ देत नाही.’ त्यामुळे महिला सरपंचांनी त्यांच्यापासून दूर आणि सावध रहावं, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. दरम्यान या वादग्रस्त वक्तव्या वरुन शिरसाट यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावरती त्यांनी आपण हे वक्तव्य आपल्या अनुभवावरून केले असून काही ग्रामसेवक चांगले काम करत असतील मात्र मला आलेल्या अनुभवावरून मी ते वक्तव्य केले. यावर मी ठाम असल्याचेही ते म्हणाले.

शिरसाट यांनी विनाशर्त माफी मागावी -

दरम्यान आज षिरसाट यांच्या वक्तव्यावरती महाराष्ट्र ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे म्हणाले 'जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयात आम्ही 27 हजार 536 ग्रामपंचायतींचं कामकाज ठप्प केलं आहे तसेच शिरसाट यांनी विनाशर्त माफी मागावी. तसेच मुख्यमंत्र्यांनी CM Uddhav Thackeray आमदारांना सक्त ताकीद द्यावी. ग्रामसेवकांबद्दल समाजात गैरसमज निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com