National Education Policy News: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीत सुकाणू समितीचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल: मंत्री दीपक केसरकर

Deepak Kesarkar News: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीत सुकाणू समितीचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल: मंत्री दीपक केसरकर
Deepak Kesarkar
Deepak Kesarkarsaam tv
Published On

National Education Policy News: राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाच्या गुणवत्तापूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. विविध अभ्यासक्रम आराखड्यांमध्ये या समिती सदस्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत.

सुकाणू समिती सदस्यांची पहिली बैठक मंत्रीकेसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. या बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक कैलास पगारे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि समिती सदस्य उपस्थित होते.

Deepak Kesarkar
Pune Police Notice to Opposition : PM मोदींच्या पुणे दौऱ्याआधी विरोधकांना पोलिसांच्या नोटीस, काय आहे प्रकरण?

केसरकर म्हणाले की, विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून शालेय शिक्षण विभाग विविध योजना आणि उपक्रम राबवित आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत अभ्यासक्रमात राज्याच्या अनुषंगाने बदल करणे आवश्यक आहे. यात सुकाणू समितीतील तज्ज्ञ सदस्यांची मते महत्त्वाची असून त्यांनी विविध समिती निवडीच्या प्रक्रियेत सहभाग घ्यावा आणि अभ्यासक्रम आराखडा वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.  (Latest Marathi News)

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूतस्तर, शालेय शिक्षण, शिक्षक शिक्षण तसेच प्रौढ शिक्षण चे अवलोकन करून त्यानुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मिती केली जाणार आहे. यासाठी शिफारस करण्याच्या अनुषंगाने विविध समित्या व उपसमित्या निवडण्यास तसेच विषयनिहाय अभ्यासमंडळ रचनेस सुकाणू समितीने मान्यता दिली.

Deepak Kesarkar
Haryana Clash News: हरियाणात शोभायात्रेत हिंसाचार, 40 वाहने जळून खाक; सरकारने इंटरनेट सेवा केली बंद

या अनुषंगाने तयार करण्यात येणाऱ्या समित्यांमध्ये अनुषंगिक विषय तज्ज्ञ, राज्यस्तरावर गौरविण्यात आलेल्या अंगणवाडी सेविका तसेच बालमानसशास्त्र तज्ज्ञांचा समावेश करण्यात यावा, अशा सूचना सुकाणू समिती सदस्यांनी केल्या. त्यांना मंत्री केसरकर यांनी मान्यता दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com