Haryana Clash News: हरियाणात शोभायात्रेत हिंसाचार, 40 वाहने जळून खाक; सरकारने इंटरनेट सेवा केली बंद

Haryana News: हरियाणात शोभायात्रेत हिंसाचार, 40 वाहने जळून खाक; सरकारने इंटरनेट सेवा केली बंद
Haryana Clash News
Haryana Clash NewsSaam Tv
Published On

Haryana Clash News: हरियाणातील नूह येथे विश्व हिंदू परिषद आणि मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या वतीने काढण्यात आलेल्या ब्रजमंडल यात्रेवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यानंतर येथे मोठा हिंसाचार झाला आहे. ज्यामध्ये 40 वाहने हिंसक जमावाने जाळली, असं सांगण्यात येत आहे.

या हिंसाचारात पोलिसांसह अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. वाद वाढत गेल्याने अनेक गोळ्याही झाडण्यात आल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने इंटरनेट सेवा बंद केली आहे. त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. नूह व्यतिरिक्त आजूबाजूच्या जिल्ह्यांतून पोलिस बंदोबस्त मागवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Haryana Clash News
PM Modi Pune Visit 2023: PM मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

सोमवारी गुरुग्रामच्या सिव्हिल लाइन्स परिसरातून यात्रेला सुरुवात झाली. भाजप जिल्हाध्यक्ष गार्गी कक्कर यांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. दुपारी नुह येथील नल्हाड शिवमंदिरातून यात्रा फिरोजपूर-झिरकाकडे रवाना झाली. खेडला मोड आणि तिरंगा पार्कच्या आसपासच्या यात्रेत वाद सुरू झाला. यात्रेत सहभागी असलेल्यांच्या वतीने घोषणाबाजी करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याला इतर गटातील लोकांनी विरोध केला. यावेळी यात्रेत गाडी घेऊन सहभागी झालेल्या लोकांनी यात्रा थांबवली.

दोन्ही बाजूंनी जोरदार वादावादी झाली. यात्रेवर दगडफेक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी लगेचच जमावाला पांगवण्यासाठी कारवाई केली. त्यानंतर पोलिसांवरही हल्लेखोरांनी दगडफेक केली. त्याचवेळी रस्त्यांवर उभ्या असलेल्या वाहनांनाही आग लावण्यात आली. तसेच हल्लेखोरांनी वाहनांची प्रचंड तोडफोड केली.  (Latest Marathi News)

Haryana Clash News
Chhatrapati Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! भरदिवसा घरात घुसून गोळीबार; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

यानंतर हा उपद्रव नूह शहरातही पसरला. हल्लेखोरांनी होडल बायपास, जुना बसस्थानक, गुरुग्राम-अलवर महामार्ग आणि अनाज मंडी परिसरातही गोंधळ घातला. इतकेच नाही तर धार्मिक स्थळांचीही तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com