"देगलूर मध्ये काँग्रेसचा मोठा विजय होईल"

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा दावा
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
महसूल मंत्री बाळासाहेब थोरातभारत नागणे
Published On

पंढरपूर : नांदेड देगलूर विधानसभा पोट निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय होईल. असा दावा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज सांगोला येथे आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, बिलोली-देगलूर विधानसभा पोट निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे.

हे देखील पाहा :

या मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चांगली प्रचार यंत्रणा लावलेली आहे. तसेच स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे चांगल्या प्रकारे जुळवल्यामुळे काँग्रेस पक्ष हि जागा निश्चितपणे जिंकेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
Aurangabad : वंचित-एमआयएम पुन्हा एकत्र येणार?

दरम्यान, राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असणाऱ्या आंदोलनाबाबत बोलताना थोरात म्हणाले, राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन काही ठिकाणी सुरू आहे. शासनाने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. पण, अजून काही विषय असतील तर मुंबईत गेल्यानंतर माहिती घेऊन यावर चर्चा करू असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com