
Satej Patil News : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावरील कारवाईनंतर काँग्रेस ॲक्शन मोडवर आली आहे. भाजपाविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा निर्धार काँग्रेस नेते माजी राज्यमंत्री आमदार सतेज पाटील (satej patil) यांनी व्यक्त केला. आमदार पाटील यांनी सांगलीत (sangli satej patil press conference) आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत आंदाेलनाबाबतची माहिती विषद केली. (Breaking Marathi News)
आमदार सतेज पाटील म्हणाले या देशात संपत चाललेल्या लोकशाहीला वाचवायचे असेल तर विद्यमान भाजपच्या विरुद्ध ताकदीने रस्त्यावर उतरावे लागेल. त्यासाठी काॅंग्रेस सज्ज झाली आहे. या लढ्यामध्ये जनतेनेही सहभागी व्हावे अशी आमची अपेक्षा आहे असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.
देशात अनेक महत्वाचे प्रश्न असताना फक्त काँग्रेस नेत्यांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे भाजपाच्या या निती विरोधात येणाऱ्या भविष्यकाळात विविध ठिकाणी आंदोलने केली जाणार आहेत. काँग्रेस म्हणून या राहुल गांधी यांच्यावरील सुडाच्या कारवाईचा निषेध नोंदविण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.