Maharashtra Political News : 'प्रकाश आंबेडकरांचं सगळं ऐकलं जाईलच असं नाही', सुशीलकुमार शिंदेंचे जागावाटपावरुन मोठं वक्तव्य

Sushilkumar Shinde News : आगामी निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान झाले पाहिजे ही काँग्रेसची पण मागणी आहे. पण याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार सरकारच्या हातात आहेत.
Prakash Ambedkar-Sushilkumar Shinde
Prakash Ambedkar-Sushilkumar ShindeSaam TV
Published On

Solapur News :

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यावर अद्याप एकमत होताना दिसत नाही. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करुन घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

मात्र प्रकाश आंबेडकर यांनी सम-समान फॉर्म्युल्याची ऑफर दिल्याने महाविकास आघाडीत मतभेद होताना दिसत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं की, प्रकाश आंबेडकर यांचं सगळं ऐकलं जाईलच असं नाही.

Prakash Ambedkar-Sushilkumar Shinde
Bhavana Gawali: शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ; आयकर विभागाची मोठी कारवाई

भाजपविरोधातील लढाईत सर्वांना बरोबर घेऊन गेले पाहिजे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवर काय चर्चा सुरू आहे, याची मला माहिती नाही.

पण भाजपविरोधातील लढाईत सर्वांना बरोबर घेऊन गेले पाहिजे, या मताचा मी आहे. प्रकाश आंबेडकर समसमान जागा मागत आहेत. मात्र त्यांचे सगळेच ऐकले जाईल, असे नाही, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Prakash Ambedkar-Sushilkumar Shinde
Kiran Mane In Politics: अभिनेते किरण मानेंची राजकारणात एन्ट्री; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधणार शिवबंधन

महाविकास आघाडीने आधी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवताना वंचितला दोन जागा सोडण्यात येतील, अशी माहिती समोर येत होती. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी थेट समान जागावाटपाचा फॉर्म्युला माध्यमांसमोर मांडला होता.

मात्र याबाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं होतं. त्यामुळे नेमका महाविकास आघाडीचा जागा वाटपचा फॉर्म्युला काय असेल आणि प्रकाश आंबेडकरांना तो मान्य होईल का? या प्रश्नाची उत्तरे येत्या काळात मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com