'आमच्या नेत्यांना हात लावला तर...'; नाना पटोले यांचा थेट ईडीच्या अधिकाऱ्यांना इशारा

ईडीने काँग्रेस नेत्यांना नोटीस पाठवली आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे
Nana patole
Nana patole Saam Tv
Published On

भंडारा : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) नॅशनल हेराल्ड प्रकरणात समन्स बजावले आहे. या प्रकरणाची चौकशी तपास संस्थेने २०१५ मध्येच बंद केली होती. मात्र, ईडीने (ED) पुन्हा या प्रकरणाची नोटीस दोघांना पाठवली आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ( Mahrashtra Politics latest News In Marathi)

हे देखील पाहा -

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर चांगलेच संतापले आहेत. नाना पटोले यांनी भंडारा जाहीर भाषणात थेट इशारा ईडी अधिकाऱ्यांना दिला आहे. 'आमचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना हात लावून दाखवा. जेवढे जेल भरायचे आहे तितके देशातील आणि महाराष्ट्रातील जेल भरवून दाखवू, अशा इशारा नाना पटोले यांनी ईडी अधिकाऱ्यांना दिला आहे.

Nana patole
'होय हे संभाजीनगरच...'; मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी औरंगाबादेत पोस्टर

नाना पटोले पुढे म्हणाले, '२०१५ च्या नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीच्या नोटीस आल्या आहे. सध्या आम्ही देशात नवसंकल्प कार्यक्रम करत असून या कार्यक्रमाचा अनुषंगाने काँग्रेसला लोक जोडत आहोत. त्यामुळे भाजपला पुढील काही दिवसात आपली खुर्ची जाण्याची भीती वाटत असल्यामुळं गांधी कुटुंबाला टार्गेट करत आहे, असे नाना पटोले म्हणाले.

'कोणताही नियम नसताना सरळ सरळ ईडीने नोटीस पाठवून दिली आहे.सत्तेचा दुरुपयोग केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून होत आहे.मात्र आमची भूमिका ठरली आहे. आमच्या नेत्यांना हात लावला तर जेवढे जेल भरायचे आहे, तितके देशातील-महाराष्ट्रातील जेल भरवून दाखवू,असा इशारा नाना पटोले यांनी ईडी अधिकाऱ्यांना दिला आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com