Pune Loksabha By-Election: पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवणार का? काँग्रेस आमदार रवींद्र धगेंकर स्पष्टच बोलले

Loksabha By-Election News: भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर आता पोटनिवडणूक होणार आहे.
Ravindra Dhangekar
Ravindra DhangekarSaam tv

Ravindra Dhangekar News: भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर आता पोटनिवडणूक होणार आहे. या जागेवर कोण निवडणूक लढवणार, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या जागेसाठी आमदार रवींद्र धगेंकर यांचे नाव देखील चर्चेत होतं. मात्र, पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवणार नाही, असे स्पष्टीकरण आमदार धगेंकर यांनी दिलं आहे. (Latest Marathi News)

आमदार रवींद्र धगेंकर हे सध्या पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, रवींद्र धगेंकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी धगेंकर यांनी पुणे पोटनिवडणुकीवर भाष्य केलं.

Ravindra Dhangekar
Satej Patil News : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला महाडिक भ्याले... सतेज पाटलांचा घणाघात

धंगेकर म्हणाले, 'भाजपने निवडणूकीपूर्वी सर्वसामान्य लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केली नाही. त्यामुळे भाजप आणि मोदी सरकार विरोधात देशात आणि राज्यात मोठी लाट तयार झाली आहे. त्यामुळे जनता मोदी सरकारला त्यांच्या मूळ ठिकाणावर नेऊन ठेवेल'.

दरम्यान,आमदार धनगेकर आज विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. दर्शना नंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदी सरकार विषयी मोठी भविष्यवाणी वर्तवली आहे.

धंगेकर म्हणाले, 'गेल्या दहा वर्षांमध्ये मोदी सरकारने सर्वसामान्य जनता,शेतकरी आणि व्यापारी यांचे एक ही काम केले नाही. उलट महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या विरोधात देशात मोठी लाट तयार झाली आहे'.

Ravindra Dhangekar
Nagpur News: 'वज्रमूठ' सभेला विरोध करण्यावरून भाजपमध्ये मतभिन्नता; स्थानिक आमदारांचा विरोध तर प्रदेशाध्यक्षांचं नाहरकत

'येत्या निवडणुकीत जनता भाजपला त्यांची जागा दाखवून‌ देईल. पुणे लोकसभेची पोट निवडणूक आपण लढवणार नाही, असे आमदार धगेंकर यांनी स्पष्ट केले. यावेळी लोणारी समाजाच्या वतीने आमदार धगेंकर यांच्यावर पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com