Nagpur News: 'वज्रमूठ' सभेला विरोध करण्यावरून भाजपमध्ये मतभिन्नता; स्थानिक आमदारांचा विरोध तर प्रदेशाध्यक्षांचं नाहरकत

नागपूरात 16 एप्रिल ला महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होत आहे. ही सभा ज्या दर्शन कॉलोनी मैदानावर होणार आहे. त्या ठिकाणाला भाजपच्या स्थानिक आमदारांनी विरोध केला आहे.
Nagpur News
Nagpur NewsSaam tv
Published On

Nagpur News: नागपूरात 16 एप्रिल ला महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' सभा होत आहे. ही सभा ज्या दर्शन कॉलोनी मैदानावर होणार आहे. त्या ठिकाणाला भाजपच्या स्थानिक आमदारांनी विरोध केला आहे. 'हे खेळाचे मैदान आहे, त्यामुळं याठिकाणी राजकीय सभा होऊ नये', अशी भूमिका भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी घेतली आहे. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्षांनी सभा स्थळाला विरोध नसल्याचं म्हटलंय. त्यामुळं 'वज्रमूठ' सभेच्या स्थळाला विरोधावरून भाजपचे विरोधाभास दिसतोय.

16 एप्रिलला नागपुरात होतेय. या सभेला उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांच्यासह आघाडीवर वरीष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी नागपुरातील दर्शन कॉलोनी येथील मैदान निश्चित करण्यात आलं आहे.

मात्र, या मैदानात सभेला पूर्व नागपुरातील आमदार कृष्णा खोपडे यांनी विरोध केला आहे. 'या मैदानाच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे, हे खेळाचे मैदान आहे, त्यामुळं राजकीय सभा याठिकाणी घेतली जाऊ नये',अशी भूमिका त्यांनी घेतलीय.

Nagpur News
Congress Leader On BJP: 'भगवी बिकीनी चालत नाही, पण भगवा कार्पेट चालतो'; आयोध्या दौऱ्यावर काँग्रेस नेत्याचे खोचक ट्वीट!

मात्र, भाजप शहराध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांनी मात्र सभेच्या स्थळाला विरोध नसल्याचं स्पष्ट केलंय. 'सभा घेण्याचा अधिकार हा प्रत्येक पक्षाला आहे. मात्र, त्याठिकामी वादग्रस्त आणि चिथावणी देणारे भाषणे झाल्यास सरकारने कारवाई करावी', अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

Nagpur News
Sachin Pilot Vs Ashok Gehlot: काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची डोकेदुखी वाढली; राजस्थानमध्ये गेहलोत-पायलटांचा संघर्ष पेटला

एकूणच महाविकास आघाडीच्या सभेवरून भाजपमध्येच 'टू बी ऑर नॉट टुबी' असा विरोधाभास दिसतोय. सभा स्थळाच्या विरोधावरून भाजपमध्ये चं दोन गट पडल्याचं दिसून येतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com