Political News : पोलीस राहुल गांधींच्या घरी चौकशीसाठी गेल्याने काँग्रेस आक्रमक; बाळासाहेब थोरात म्हणाले...

'संसदेत राहुल गांधी बोलू नयेत यासाठी गोंधळ घातला जात असल्याची टीका देखील थोरात यांनी भाजप सरकारवर केली.
Rahul Gandhi
Rahul Gandhisaam tv

सचिन बनसोडे

Rahul Gandhi News : भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी काश्मीरमध्ये केलेल्या वक्तव्यावर दिल्ली पोलीस त्यांच्या घरी चौकशीसाठी पोहोचले होते. दिल्ली पोलीस राहुल गांधी यांच्या घरी चौकशीसाठी गेल्याने काँग्रेस आक्रमक झाली आहे. राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी गेले हे अत्यंत निषेधार्य असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.

'संसदेत राहुल गांधी बोलू नयेत यासाठी गोंधळ घातला जात असल्याची टीका देखील थोरात यांनी भाजप सरकारवर केली. (Latest Marathi News)

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. बाळासाहेब थोरात म्हणाले, 'संसदेत बोलू दिलं जात नाही म्हणून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली. विरोधी पक्षांसह जनतेचेही माईक बंद करण्याचे काम होतंय हा लोकशाहीवर आघात आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केलेल्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी गेले हे अत्यंत निषेधार्य आहे.

Rahul Gandhi
Eknath Shinde Speech : 'याच मैदानावर फुसका आपटी बार येऊन गेला', मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर शाब्दिक 'गोळीबार'

'मी महसूल खातं संभाळलेलं आहे. त्यामुळे नवीन वाळू धोरण कधी येणार याची आम्हाला उत्सुकता आहे. गुजरातची वाळू महाराष्ट्रात येते म्हणजे महाराष्ट्राचा महसूल गुजरातला जात आहे. गुजरातमधून पावडर देखील येते आणि इथे स्वच्छ केले जाते, असा टोला देखील बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांचे नाव न घेता लगावला.

दरम्यान, राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर भाष्य करताना थोरात यांनी शिंदे सरकार आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली.

Rahul Gandhi
Ramdas Kadam : सिंगापूर, श्रीलंका, अमेरिकेला कुणाचे हॉटेल आहेत? रामदास कदम यांनी भरसभेत सर्वच उघड केलं

'अवकाळी झालेल्या नुकसानीच्या बाबतीत राज्य सरकार संवेदनशील नाही. फोटो काढण्यासाठी काहीतरी करतात. आत्महत्या पूर्वीपासून होत आहेत. तसेच नुकसान झालंच नाही अशी वक्तव्ये कृषिमंत्र्यांना करणे योग्य वाटत नाही, संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी अशी वक्तव्य केली तर शेतकरी आणखी निराश होतो. ही परिस्थिती दुर्दैवाने आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com