मोदी सरकारचे ब्लॅकमेलिंगचे काम लोकशाहीसाठी घातक, नाना पटोले यांची सडकून टीका

ईडीनं शिवसेना खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानं महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे.
Nana Patole Narendra Modi
Nana Patole Narendra ModiSaam Tv
Published On

मुंबई : सक्तवसुली संचालनालय (ईडीनं) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांना ताब्यात घेतल्यानं महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यभरात शिवसेना आक्रमक झाली असून केंद्र सरकार आणि ईडी (Enforcement Directorate) विरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राजकीय वर्तुळातून अनेक नेतेमंडळी संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देत आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Nana Patole) नाना पटोले यांनीही केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीकास्त्र डागलं आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार ब्लॅकमेलिंग आणि भीतीदायक काम करत आहे. मोदी सरकारचं (Narendra Modi) काम लोकशाहीसाठी घातक आहे. आसामला जे आमदार गेले होते, त्यातील काही परत आले. ५० कोटींमध्ये आमदारांना विकत घेण्याची चर्चाही सुरु होत्या. भाजपकडे एवढा पैसे कुठून आला ? उद्या खासदारांनाही विकत घ्यायचे काम करतील,असं म्हणत नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Nana Patole Narendra Modi
Commonwealth Games 2022 : भारताचा पाकिस्तानवर एकतर्फी विजय, स्मृती मानधनाची चौफेर फटकेबाजी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे वस्त्रहरण आणि अपमान करण्याचं काम केलं. याबाबत महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असतानाच संजय राऊत यांच्यावर कारवाई करुन विषयाला बगल देण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत, असंही राऊतांनी स्पष्ट केलं होतं. परंतु मोदी सरकार ब्लॅकमेलिंग आणि भीती घालण्याचं काम करत आहे. ते लोकशाहीसाठी घातक आहे. ईडीने कारवाई केल्यानंतर नेते भाजपमध्ये जातात. असे अनेक जण केंद्रात मंत्री झाले. पण त्यांच्यावर कारवाई का होत नाही ? भाजपमध्ये गेलेल्यांचे काय शुद्धीकरण केले ते सांगावे,असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला आहे.

Nana Patole Narendra Modi
Mumbai: संजय राऊतांच्या घरातून साडेअकरा लाख रुपयांची रक्कम जप्त; ईडी चौकशी अजूनही सुरुच

पटोले माध्यमांशी बोलताना पुढं म्हणाले, इंग्रजांविरोधात बोलले की कारवाई व्हायची, तशीच कारवाई आता होत आहे. संजय राऊतांवर केलेली कारवाई महाविकास आघाडीला धक्का नाही म्हणता येणार. हे तर भाजपचे दबावतंत्र आहे. एखाद्या व्यक्तीचा आवाज दाबण्यासाठी हे दबावतंत्र आहे. ही हुकूमशाही जास्त काळ चालू शकणार नाही. मी नाईलाजास्तव चाललोय, असं अर्जुन खोतकर म्हणाले. याचा उद्रेक होणार आहे. याचे परिणाम केंद्र सरकारलाही भोगावे लागणार, असा घणाघातही पटोले यांनी विरोधकांवर केला.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com